ह्रतिक रोशनकडे 2 बिग प्रोजेक्ट; पण डॉन 3 मध्ये दिसणार की नाही? चाहत्यांसाठी खूशखबर
Hrithik Roshan Focuses on Krrish 4: ह्रतिक रोशन सध्या 2 प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. हृतिक क्रिश 4 या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

Hrithik Roshan Focuses on Krrish 4: 2025 हे वर्ष बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांसाठी जोरदार ठरले. वर्षाच्या शेवटी धुंरधर या चित्रपटाने धुवांधार कमाई केली. 2025 या वर्षी अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. परंतु, काही चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये जादू चालली. तर, काही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फेल ठरले. धुरंधर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची पावलं आपोआप चित्रपटगृहाच्या दिशेनं वळत आहेत. अभिनेता रणवीर सिंह सध्या धुरंधर चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यानं डॉन 3 मधून काढता पाय घेतला. सध्या या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत ह्रतिक रोशन दिसणार असल्याची चर्चा आहे.
ह्रतिक रोशन २ चित्रपटांमध्ये व्यग्र
ह्रतिक रोशन सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. ह्रतिक रोशन डॉन 3मध्ये दिसणार की नाही? या चर्चांवर शिक्कामोर्तब झालेला नाही. पण तो लवकरच आगामी 2 मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार असल्याची माहिती आहे. पण ह्रतिक नेमकं कोणत्या बिग प्रोजेक्ट्सच्या तयारीत आहे? जाणून घेऊयात.
2025 या वर्षी ह्रतिक रोशन बिग प्रोडजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीस आला नाही. वॉर चित्रपटाचा सिक्वेल वॉर २ प्रेक्षकांच्या भेटीस आला. परंतु. हा चित्रपट सिनेमागृहात फार चालला नाही. या चित्रपटात ज्यूनिअर एनटीआर खलनायकाच्या भूमिकेत होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला. 400 कोटी रूपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाचे पैसेही वसूल झाले नाही.
ह्रतिक क्रिश 4 चित्रपटाचे दिग्दर्शन करणार
ह्रतिक सध्या बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे. तो क्रिश 4 या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. त्याचे वडील राकेश रोशन आणि आदित्य चोप्रा हे या प्रोजेक्टसाठी निधी देत आहेत. म्हणूनच ह्रतिक रोशनचं सध्या पूर्णपणे या प्रोजेक्टवर लक्ष आहे. गेल्या अनेक अनेक वर्षांपासून या प्रोजेक्टवर काम सुरू आहे. राकेश रोशन यांनी हा चित्रपट 2027 रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.
क्रिश 4 व्यतिरिक्त ह्रतिक होम्बले एंटरमेंटसोबत भागीदारी केली आहे. हे प्रमुख प्रोडक्शन हाऊस केवळ चित्रपटांना फक्त निधी पुरवत नाही तर, विविध भाषांमधील चित्रपटांचे वितरण देखील करते. सध्या ह्रतिक त्याच्या दोन्ही प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.























