(Source: Poll of Polls)
Hrithik Roshan : 72 वर्षाचे राकेश रोशन फिटनेसबाबत मुलाला देतात टक्कर; ह्रतिकनं शेअर केला खास व्हिडीओ
राकेश रोशन (Rakesh Roshan) यांचे वय 72 वर्षे आहे. तरी देखील राकेश हे जिमध्ये जाऊन वर्क-आऊट करतात.
Hrithik Roshan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशनचे (Hrithik Roshan) वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) हे सध्या त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहेत. ह्रतिकनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राकेश रोशन हे वर्क आऊट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी राकेश रोशनच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे.
राकेश रोशन यांचे वय 72 वर्षे आहे. तरी देखील राकेश हे जिमध्ये जाऊन वर्क-आऊट करतात. राकेश रोशन यांचा व्हिडीओ शेअर करुन ह्रतिकनं कॅप्शनमध्ये लिहिलं, माझे वडील हे माझ्यापेक्षा फिट आणि कूल आहेत.' तसेच 'गोल्स' असंही ह्रतिकनं या कॅप्शनमध्ये लिहिलं. या व्हिडीओला फरहान अख्तरनं कमेंट करुन राकेश यांच्या फिटनेसचं कौतुक केलं. तसेच ह्रतिकची एक्स वाईफ सुझैन खाननं देखील या व्हिडीओला कमेंट केली आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
48 वर्षाचा ह्रतिक देखील आहे फिटनेस फ्रिक
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन हा त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. तो वर्क-आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो. 'फायटर' (Fighter), 'विक्रम वेधा' आणि 'क्रिष 4' (Krrish 4) हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'विक्रम वेधा' हा ह्रतिकचा आगामी चित्रपट चित्रपट 30 सप्टेंबर 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटामध्ये ह्रतिकसोबतच अभिनेता सैफ अली खान हा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा: