Hrithik Roshan, Vikram Vedha : हृतिक रोशनने युपीमध्ये शूट करण्यास नकार दिला? चित्रपटाचे निर्माते म्हणतात...
Hrithik Roshan, Vikram Vedha : आर माधवन (R Madhavan) आणि विजय सेतुपती (Vijay sethupathi) यांच्या 'विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकची घोषणा झाल्यापासून लोक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Hrithik Roshan, Vikram Vedha : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांचा आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा आगामी चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. आर माधवन (R Madhavan) आणि विजय सेतुपती (Vijay sethupathi) यांच्या 'विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकची घोषणा झाल्यापासून लोक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, सध्या हा चित्रपट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकत्याच अशा चर्चा समोर आल्या होत्या की, हृतिकने मेकर्ससमोर अशी अट ठेवली की, ज्यामुळे त्यांना चित्रपटाचे बजेट दुप्पट करावे लागले होते.
‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग हे दुबईमध्ये झाले आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी चक्क दुबईमध्ये उत्तर प्रदेशच्या गल्ल्यांचा सेट लावण्यात आला होता. अभिनेता हृतिक रोशन याने उत्तर प्रदेशमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करण्यास नकार दिल्याने मेकर्सला हे पाऊल उचलावे लागले, असे म्हटले जात होते. हृतिकच्या मागणीमुळे चित्रपट निर्मात्यांवर खर्चाचा बोजा वाढला, असे म्हणण्यात येत होते. मात्र, आता यावर निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले निर्माते?
निर्मात्यांनी या चर्चांना केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. यावर स्पष्टीकरण देताना निर्मात्यांनी एक निवेदन शेअर केले आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘आम्ही विक्रम वेधाच्या शूटिंग लोकेशनबद्दल येणाऱ्या या निराधार बातम्या वाचत आहोत. या चित्रपटाचे शूटिंग परदेशात झाले असले, तरी बरेचसे शूट भारतातही झाले आहे. यात युपी आणि लखनऊचा देखील समावेश आहे. मात्र, याचा एक मोठा भाग दुबईमध्ये शूट करण्यात आला. 2021मध्ये कोरोनाचा कहर सुरु असताना हे एकमेव ठिकाण होते, जिथे बायो-बबलच्या सुविधेसह शूट आणि सेट लावण्याची परवानगी होती. सर्वांची काळजी आणि सुरक्षेच्या दृष्टीने आम्हीच हा निर्णय घेतला होता. मात्र, आता यागोष्टीला अशा प्रकारे सादर करणं चुकीचं आहे.’
पाहा पोस्ट :
'विक्रम आणि वेताळ' या भारतीय लोककथेवर आधारित, 'विक्रम वेधा' हा एक उत्कृष्ट अॅक्शन क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट एका कठोर पोलीस अधिकाऱ्याच्या कथेभोवती फिरतो. जो एक खतरनाक गुंड शोधण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी निघतो. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान दोन सुपरस्टार एकत्र काम करत आहेत.
हेही वाचा :
Hrithik Roshan : ह्रतिकचा 'विक्रम वेधा' मधील लूक; फोटो पाहून सबा म्हणाली..
Vikram Vedha : सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' मधील लूक रिलीज ; करिना म्हणाली...