एक्स्प्लोर

Miss World : मुंबईत रंगणार 'मिस वर्ल्‍डची' ग्रॅण्‍ड फिनाले, जिओ वर्ल्‍ड कन्‍वेंशन सेंटरमध्ये होणार आयोजन

71वा मिस वर्ल्‍ड सोहळ्याला 20 फेब्रुवारी रोजी नवी दिल्‍लीमधील आलिशान हॉटेल द अशोक येथे 'उद्घाटन समारोह' आणि इंडिया टुरिझम डेव्‍हलमेंट कॉर्पोरेशन (आयटीडीसी) चा 'इंडिया वेलकम्‍स द वर्ल्‍ड गाला'सह सुरूवात होईल.

मुंबई : 71व्या मिस वर्ल्‍ड (Miss World) सोहळ्याच्या ग्रॅण्‍ड फिनालेचे आयोजन 9 मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्‍ड कन्‍वेंशन सेंटर (Jio World Convention Center) येथे भव्‍य सोहळ्यासह करण्‍यात येणार असल्याची घोषणा आज मिस वर्ल्‍ड ऑर्गनायझेशनने अधिकृतरित्‍या केली. या सोहळ्याचे जगभरात स्ट्रिमिंग व प्रसारण करण्‍यात येईल. 18 फेब्रवारी ते 9 मार्च 2024 दरम्‍यान या सोहळ्याचे आयोजन देशभरातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे.जगभरातील देशांमधील 120 महिला स्‍पर्धक विविध स्‍पर्धा आणि चॅरिटेबल उपक्रमांमध्‍ये सहभाग घेतील, तसेच त्‍या परिवर्तनाच्‍या अॅम्‍बेसेडर्स देखील बनतील. आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्री-लाँच परिषदेमध्‍ये माजी मिस वर्ल्ड विजेत्या कुमारी टोनी ॲन सिंग, कुमारी व्हेनेसा पोन्स डी लिऑन, कुमारी मानुषी छिल्लर आणि कुमारी स्टेफनी डेल व्हॅले यांच्यासह सध्याची मिस वर्ल्ड कुमारी कॅरोलिना बिएलॉस्का पहिल्यांदाच पहिल्‍यांदाच ग्रॅण्‍ड फिनालेसाठी मंचावर एकत्र आल्‍या.

71वा मिस वर्ल्‍ड सोहळ्याला 20 फेब्रुवारी रोजी नवी दिल्‍लीमधील आलिशान हॉटेल द अशोक येथे 'उद्घाटन समारोह' आणि इंडिया टुरिझम डेव्‍हलमेंट कॉर्पोरेशन (आयटीडीसी) चा 'इंडिया वेलकम्‍स द वर्ल्‍ड गाला'सह सुरूवात होईल. मिस वर्ल्‍ड ऑर्गनायझेशनच्‍या अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जुलिया मोर्ले सीबीई म्‍हणाल्‍या, ''भारताप्रती माझे प्रेम लपलेले नाही आणि या देशामध्‍ये ७१वा मिस वर्ल्‍ड फेस्टिवलचे आयोजन माझ्यासाठी उत्‍साहवर्धक बाब आहे. भारतात या फेस्टिवलला पुन्‍हा आणण्‍याचे स्‍वप्‍न सत्‍यात अवतरण्‍यासाठी जमिन सैदी यांचे त्‍यांच्‍या अथक प्रयत्‍नांकरिता मनापासून आभार. आम्‍ही ७१व्‍या पर्वासाठी अत्‍यंत सर्वोत्तम टीम एकत्र केली आहे. 120 मिस वर्ल्‍ड नेशन्‍सचे स्‍वागत, ज्‍यांनी जगभरातील त्‍यांच्‍या 'ब्‍युटी विथ ए परपज अॅम्‍बेसेडर्स'ना पाठवले आहे. आम्‍ही तुम्‍हा सर्वांचे ७१वा मिस वर्ल्‍ड फेस्टिवलमध्‍ये स्‍वागत करतो.”

28 वर्षांनंतर मिस वर्ल्ड भारतात

भारतातील 71व्या मिस वर्ल्ड फेस्टिवलचे भव्‍य सेलिब्रेशन उल्‍लेखनीय क्षण आहे, कारण हा सोहळा 28 वर्षांनंतर देशात परतला आहे.  ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा आणि  मानुषी छिल्लर यांसारख्या उल्लेखनीय व्यक्तींसह असंख्य मिस वर्ल्ड विजेत्यांचा समृद्ध वारसा भारताला लाभला आहे. या यशांमुळे जागतिक स्तरावर भारताचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला आहे. 1951 मध्ये सुरू झालेली मिस वर्ल्ड स्पर्धा पारंपारिक सौंदर्य स्पर्धांच्या पलीकडे जात परोपकार आणि सेवेद्वारे महिलांना सक्षम करण्‍यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या नवीन तत्त्वांचा अवलंब करते.71वा मिस वर्ल्ड फेस्टिवलचे प्रोडक्‍शन सहयेागी आहेत एण्‍डेमोल शाइन - मनोरंजन टेलिव्हिजनमधील जागतिक अग्रणी कंपनी, जिचे नेतृत्‍व त्‍यांचे अद्वितीय सीईओ रिषी नेगी यांच्‍याद्वारे केले जाते. रिषी व त्यांची टीम 71वा मिस वर्ल्‍ड फेस्टिवलचे उल्‍लेखनीय व व्‍यापक कव्‍हरेज प्रदान करण्‍यासाठी आमची एक्‍सक्‍लुसिव्‍ह लाइव्‍ह ब्रॉडकास्‍ट सहयोगी सोनी लिव्‍हसोबत काम करणार आहे.

सोनी लिव्‍ह आणि स्‍टुडिओनेक्‍स्‍टचे व्‍यवसाय प्रमुख दानिश खान म्‍हणाले, ''आम्‍हाला घोषणा करताना आनंद होत आहे की, सोनी लिव्‍ह मिस वर्ल्‍ड ब्‍युटी पेजंटसाठी विशेष स्‍ट्रीमिंग व्‍यासपीठ असणार आहे आणि आम्‍हाला खात्री आहे की, मिस वर्ल्‍ड सादर करणारे भव्‍यता, हेतू व सांस्‍कृतिक विविधतेच्‍या या जागतिक प्रदर्शनाचे लाइव्‍ह टेलि‍कास्‍ट सर्वसमावेशक अनुभव असेल.''या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत बनिजय एशिया अॅण्‍ड एण्‍डेमोलशाइन इंडियाचे ग्रुप सीओओ रिषी नेगी म्हणाले, ''आम्‍हाला जगभरातील सर्वात प्रसिद्ध इव्‍हेण्‍टमध्‍ये आमचे प्रॉडक्‍शन कौशल्‍य आणण्‍याचा आनंद होत आहे, ज्‍यामुळे हाय-प्रोफाइल प्रकल्‍पांचा आमचा पोर्टफोलिओ अधिक दृढ होईल. मिस वर्ल्‍ड ऑर्गनायझेशनसोबतच्‍या या सहयोगामधून जागतिक दर्जाचे कन्‍टेन्‍ट सादर करण्‍याप्रती आमची कटिबद्धता, तसेच प्रतिष्ठित जागतिक इव्‍हेण्‍ट्सचे व्‍यवस्‍थापन करण्‍याप्रती आमची क्षमता दिसून येते.''

ही बातमी वाचा : 

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन पुन्हा एकदा अयोध्येत पोहचले, रामाचे दर्शन घेत नव्या प्रोजेक्टला सुरुवात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? आज होणार मोठा निर्णय, रोहित शर्माचं टेन्शन मिटणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीत जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत असणार की नाही? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
Tanaji Sawant Son: तानाजी सावंतांचा मुलगा घरच्यांना न सांगता बँकॉकला का गेला? पुणे पोलिसांनी ऋषिराजचा जबाब नोंदवला
तानाजी सावंतांचा मुलगा घरच्यांना न सांगता बँकॉकला का गेला? पुणे पोलिसांनी ऋषिराजचा जबाब नोंदवला
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांना मारल्यानंतर कराड गँग स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळत सुटली; CCTV फुटेज आलं समोर
संतोष देशमुखांना मारल्यानंतर कराड गँग स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळत सुटली; CCTV फुटेज आलं समोर
Nashik News : खते-बियाण्यांमध्ये भेसळ, कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवर, नाशिकमध्ये 62  विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई
खते-बियाण्यांमध्ये भेसळ, कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवर, नाशिकमध्ये 62 विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 News : Superfast News : 8 AM : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP MajhaVaibhavi Santosh Deshmukh HSC Exam : वैभवी देशमुखची आजपासून बारावीची परीक्षाRushikesh Sawant :  Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.30 AM : ABP Majha : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? आज होणार मोठा निर्णय, रोहित शर्माचं टेन्शन मिटणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीत जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत असणार की नाही? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
Tanaji Sawant Son: तानाजी सावंतांचा मुलगा घरच्यांना न सांगता बँकॉकला का गेला? पुणे पोलिसांनी ऋषिराजचा जबाब नोंदवला
तानाजी सावंतांचा मुलगा घरच्यांना न सांगता बँकॉकला का गेला? पुणे पोलिसांनी ऋषिराजचा जबाब नोंदवला
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांना मारल्यानंतर कराड गँग स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळत सुटली; CCTV फुटेज आलं समोर
संतोष देशमुखांना मारल्यानंतर कराड गँग स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळत सुटली; CCTV फुटेज आलं समोर
Nashik News : खते-बियाण्यांमध्ये भेसळ, कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवर, नाशिकमध्ये 62  विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई
खते-बियाण्यांमध्ये भेसळ, कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवर, नाशिकमध्ये 62 विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई
ITR भरणाऱ्यांची संख्या वाढली, गेल्या पाच वर्षात प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या 70 लाखांनी घटूनही सरकारच्या कमाईत जोरदार वाढ
ITR भरणाऱ्यांची संख्या 8 कोटींवर, करदात्यांची संख्या 70 लाखांनी घटली पण सरकारची कमाई वाढली
Guillain Barre Syndrome: पुण्यात ‘जीबीएस’चा आणखी एक बळी! एकूण रुग्णांच्या संख्येतही वाढ, 21 जण व्हेंटिलेटरवर
पुण्यात ‘जीबीएस’चा आणखी एक बळी! एकूण रुग्णांच्या संख्येतही वाढ, 21 जण व्हेंटिलेटरवर
Uday Samant : देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
Beed: सरपंच संतोष देशमुखांची लेक डोंगराएवढं दु:ख बाजुला सारुन परीक्षेला रवाना, बारावीचा आज पहिला पेपर
सरपंच संतोष देशमुखांची लेक डोंगराएवढं दु:ख बाजुला सारुन परीक्षेला रवाना, बारावीचा आज पहिला पेपर
Embed widget