Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन पुन्हा एकदा अयोध्येत पोहचले, रामाचे दर्शन घेत नव्या प्रोजेक्टला सुरुवात
Amitabh Bachchan : अयोध्येत 500 वर्षांनंतर पुन्हा एकदा राम मंदिराची निर्मिती झाली. 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले होते.
Amitabh Bachchan : अयोध्येत 500 वर्षांनंतर पुन्हा एकदा राम मंदिराची निर्मिती झाली. 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले होते. दरम्यान, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज (दि.9) पुन्हा एकदा रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचले आहेत.
पुन्हा एकदा घेतले रामाचे दर्शन
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आज (दि. 9) पुन्हा एकदा रामाचे दर्शन घेतले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीग बी एका खास कार्यक्रमासाठी अयोध्येत दाखल झाले होते. ते सोन्याच्या दुकानाच्या ओपनिंगसाठी गेले होते. दरम्यान, रामाच्या नगरीत गेल्यानंतर कोणालही रामाचे दर्शन घ्यावे असेच वाटेल. त्यामुळेच अमिताभ बच्चन यांनीही अयोध्येत जात हजेरी लावली. रामाबाबत अमिताभ बच्चन यांची भक्ती पाहून चाहत्यांनाही आनंद झाला आहे. चाहते महानायक बच्चन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. मोठ्या सुरक्षेत बच्चन यांची गाडी अयोध्येतून बाहेर पडले.
View this post on Instagram
22 जानेवारीलाही अयोध्येत होते महानायक
राम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडला होता. यावेळी महानायक अमिताभ बच्चनही उपस्थित होते. त्यांनी जय श्री राम लिहित इन्स्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली होती. उद्घाटन सोहळ्याला अमिताभ बच्चन उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासमवेत आले होते. यावेळी त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पीएम नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. अमिताभ बच्चन हे सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. Kalki 2898 AD, गणपत, ऊंचाई, सेक्शन 84 या सिनेमांचा समावेश आहे. शिवाय, कोण बनेगा करोडपती हा शो ही तेच होस्ट करताना दिसतात. चाहत्यांकडून अजूनही त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो. सध्या काही साऊथ सिनेमांमध्येही बच्चन काम करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या