Beed: सरपंच संतोष देशमुखांची लेक डोंगराएवढं दु:ख बाजुला सारुन परीक्षेला रवाना, बारावीचा आज पहिला पेपर
संतोष देशमुख यांचे दुःख विसरून बारावी बोर्डाचा पहिला पेपर देण्यासाठी वैभवी देशमुख आता जामखेडच्या परीक्षा केंद्रावर गेली आहे.

Beed: मस्साजोगमध्ये आपल्या वडिलांची दिवसाढवळ्या झालेली हत्या, या प्रकरणाच्या तपासात अपहरण, खंडणी, आरोपींकडून आलेल्या धमक्या, संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या न्यायासाठीचा लढा आणि आता वडिलांच्या हत्येनंतर घरातील प्रचंड तणावाच्या वातावरणात वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) आज बारावी बोर्डाच्या पहिल्या पेपरसाठी परीक्षा केंद्रावर गेली. वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून संतोष देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जामखेड मधील तिचे परीक्षा केंद्रावर घरातून निघाली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून (11 फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. (12th Board Exam)
वडिलांच्या मृत्यूचे दु:ख विसरून परीक्षा देणार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झाल्यानंतर राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले. ही हत्या एवढी निर्घृण होती की दिवसाढवळ्या खंडणी,अपहरण ,धाकटपट,आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला . वडिलांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या वैभवीची 'माझे बाबा परत येणार आहेत का ? ' ही आर्त हाक हृदय पिळवटून टाकणारी आहे . वडिलांच्या हत्येनंतर आता दोन महिन्यांचा कालावधी लोटलाय . दरम्यान , संतोष देशमुख यांचे दुःख विसरून बारावी बोर्डाचा पहिला पेपर देण्यासाठी वैभवी देशमुख आता जामखेडच्या परीक्षा केंद्रावर गेली आहे. संतोष देशमुख यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैभवी आजपासून 12 वीची परीक्षा देत आहे. (Vaibhavi Deshmukh)
तपास होईल पण वडील वापस येणार आहेत का?
माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं .आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार ? प्रशासन नक्की करतंय काय ? असा संतप्त सवाल करत वैभवी वडिलांच्या हत्येचा निषेध करत रस्त्यावर उतरली होती. न्यायासाठी प्रशासनाला जाब विचारत प्रसंगी धीट पावलं उचलत तिने परिस्थिती मोठ्या खंबीरपणे हाताळल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात दररोज नवनवे उलगडे होत आहेत. या खूनाला दोन महिने पूर्ण झाले असले तरी अद्याप एक आरोपी फरार आहे. या घटनेच्या तपासात आरोपींच्या मोबाईलमधील पुरावे नष्ट केल्याचा आरोप होत आहे. ओरोपींचे रिमांड घ्यावे अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख करतायत. या प्रकरणाला नवे वळण आले असताना वडिलांच्या मृत्यूचं डोंगराएवढं दु:ख बाजूला सारून वैभवी बारावीच्या परीक्षेला गेली आहे.
हेही वाचा:
Uday Samant : देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
