VIDEO : भर पावसात गौतमी पाटीलचे 36 नखरे, 'देखेगा क्या जवानी सनम' गाण्यावर तुफान डान्स
Gautami Patil dance video : नृत्यांगणा गौतमी पाटील हिने Tu Pyaasa Hai या गाण्यावर तुफान डान्स केलाय. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

Gautami Patil dance video : नृत्यांगणा गौतमी पाटील हिने Tu Pyaasa Hai या नेहा कक्करच्या गाण्यावर भर पावसात तुफान डान्स (Gautami Patil dance video) केलाय. यावेळी तिने ब्लॅक टीशर्ट आणि ब्ल्यू जीन्स घातलेली असून ती (Gautami Patil dance video) पावसात नृत्य करताना दिसत आहे. गौतमी पाटीलचा हा व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातलाय. नेटकऱ्यांनी गौतमीच्या या डान्स व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. गौतमीच्या या डान्सने (Gautami Patil dance video) चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं असून, तिच्या नृत्यशैलीचं कौतुक केलं जात आहे.
VIDEO : भर पावसात गौतमी पाटीलचे 36 नखरे, 'देखेगा क्या जवानी सनम' गाण्यावर तुफान डान्स pic.twitter.com/VkAtlUXE5n
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) September 18, 2025
गौतमी पाटीलच्या नृत्यशैलीवर अधूनमधून टीका झाली असली तरी, तिच्या परिश्रम आणि नैसर्गिक गुणांमुळे ती महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना म्हणून ओळखली जाते. तिच्या संघर्षमय आयुष्याने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे.
गौतमी पाटीलने कोण कोणत्या गाण्यांसाठी काम केलंय?
“कृष्ण मुरारी” या गवळणीतून गौतमीने प्रथमच गवळण सादर केली. “माझा कृष्ण मुरारी, माझी छेड काढीतो” या ओळींमधून श्रीकृष्णाच्या खोडकर लीलांचे वर्णन ती गोपिकेच्या भूमिकेतून करते.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावची रहिवासी असलेली गौतमी कठीण परिस्थितीतून पुढे आली. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडून तिने नृत्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. अकलूज लावणी महोत्सवात बॅकडान्सर म्हणून तिचा पहिला कार्यक्रम झाला, ज्यासाठी तिला 500 रुपयांचं मानधन मिळालं. नंतर पुण्यातील लावणी अकॅडमीमध्ये तिने प्रशिक्षण घेतलं. गौतमीने अनेक कार्यक्रमांतून आपल्या नृत्यकलेने नाव कमावलं असून, सोशल मीडियावरही ती लोकप्रिय झाली आहे. सध्या ती महिन्याला 22 ते 25 कार्यक्रम करते आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी अंदाजे 2 लाख रुपये मानधन मिळवते.
“तंबू पिरमाचा पेटला” हे गाणं ‘आंबट शौकीन’ या चित्रपटात असून, यामधील गौतमीच्या ठसकेबाज अदांनी प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं.
“बापाचा बाप येतोय” हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजलं. यातील तिचा लूक आणि डान्स स्टाईल प्रेक्षकांनी विशेष पसंत केला.
“चंद्रावानी रूप माझं नजरा लावू नका” या ‘घुंगरु’ चित्रपटातील लावणीत तिच्या मोहक अदांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. “सरकार तुम्ही केलाय मार्केट जाम” हे गाणं देखील चाहत्यांत प्रचंड लोकप्रिय ठरलं असून, त्यातील तिच्या नृत्यशैलीचं कौतुक झालं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
VIDEO : सुंदरी..सुंदरी, संजू राठोडचा धमाका सुरुच, आता नव गाणं रिलीज, यूट्यूबवर 5.44 मिलियन Views























