VIDEO : सुंदरी..सुंदरी, संजू राठोडचा धमाका सुरुच, आता नव गाणं रिलीज, यूट्यूबवर 5.44 मिलियन Views
Sundari Song by Sanju Rathod : सुंदरी..सुंदरी, संजू राठोडचा धमाका सुरुच, आता नव गाणं रिलीज, यूट्यूबवर 5.44 मिलियन Views

Sundari Song by Sanju Rathod : एक नंबर तुझी कंबर..., गुलाबी साडी आणि लाली लाल लाल.., अशी गाणी गेल्या काही महिन्यांमध्ये इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाली. अजूनही या गाण्यांची क्रेझ कमी झालेली नाही. (Sundari Song by Sanju Rathod) गायक संजू राठोडने जणू इन्स्टाग्रामवर नवे ट्रेंड सेट करतोय. दरम्यान, संजू राठोडचं 11 सप्टेंबर रोजी आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. सुंदरी ..सुंदरी ..असं गाण्याचं नाव आहे. (Sundari Song by Sanju Rathod)
संजू राठोडचं सुंदरी हे गाणं 11 सप्टेंबर रोजी यूट्यूबवर रिलीज झालं आहे. या गाण्याला आत्तापर्यंत यूट्यूबवर 5.9 मिलियन लोकांनी पाहिलंय. हे गाणं संजू राठोडनेच लिहिलं अजून त्यानेच गायलं देखील आहे. या गाण्याचं दिग्दर्शन Himanshu Dhar यांनी केलंय. तर कला दिग्दर्शक म्हणून Sagar Panchal यांनी पाहिलंय. G-Spark ने या गाण्याची निर्मिती केली आहे. सध्या यूट्यूबसह इन्स्टाग्रामवर या गाण्याला भरभरुन प्रतिसाद मिळतोय. (Sundari Song by Sanju Rathod)
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
पाल दिसली की घाबरणाऱ्यांनो, आमच्या नगरीत दोन अजगर सापडले, अवधूत गुप्तेंची पोस्ट नेमकी काय?























