एकादशी दिवशी मटण खाल्लं ही पोस्ट आवडली नाही, चाहत्याने भावना व्यक्त केल्या, अभिनेत्री हेमांगी कवीचं प्रत्युत्तर
Actress Hemangi Kavi : एकादशी दिवशी मटण खाल्लं ही पोस्ट आवडली नाही, चाहत्याने भावना व्यक्त केल्या, अभिनेत्री हेमांगी कवीचं प्रत्युत्तर

Actress Hemangi Kavi : अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर सक्रिय असते. (Actress Hemangi Kavi) ती तिच्या भावना सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून बेधडकपणे मांडत असते. यामुळे तिला कधी कधी चाहत्यांच्या नाराजीला देखील सामोरं जावं लागतं. हेमांगी कवीची (Actress Hemangi Kavi) सध्या एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. यामध्ये तिने मुलाखती द्यायचं का बंद केलं? याबाबतचा उहापोह केला आहे. दरम्यान, या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट करत हेमांगी कवीबाबत (Actress Hemangi Kavi) नाराजी व्यक्त केली आहे. हेमांगी कवीचा चाहता काय म्हणाला? आणि तिने कशाप्रकारे प्रत्युत्तर दिलं? जाणून घेऊयात..
चाहत्याने कमेंटच्या माध्यमातून हेमांगीला प्रतिक्रिया दिली की, "बाकी मॅडम मला तुमच्या कुठल्या हि निर्णयावर काही बोलायचं नाही... पण एकादशीच्या दिवशी आईने मटण केलं होतं म्हणून खाल्लं ती पोस्ट आवडली नाही. आवश्य खा बाबा.. पण सोशल मीडिया वर सांगून काय उपयोग...."...यावर अभिनेत्री हेमांगी कवी हिने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री हेमांगी कवी चाहत्याला प्रत्युत्तर देताना म्हणाली, एकादशीपेक्षा माझी आई आणि तिच्या भावना मला जास्त महत्त्वाच्या वाटतात. माझा देव, एकादशी, उपवास, शास्त्र वगैरे माझे जन्मदाते आहेत. तुम्हाला नाही आवडलं काहीही हरकत नाही.

हेमांगी कवीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. 2013 मध्ये प्रसारित झालेल्या 'फू बाई फू' या शोमध्ये ती प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. त्यानंतर 2019 मध्ये आलेल्या मिसेस मुख्यमंत्री या मालिकेत तिने रागिणी शिंदे ही भूमिका साकारली. पुढे 2020 साली दाखल झालेल्या मड्डम सासू धडडम सून या मालिकेत देखील ती झळकली होती. मड्डम सासू धडडम सून ही मालिका दिग्दर्शक राजू सावंत यांनी दिग्दर्शित केली होती. यात वर्षा उसगावकर आणि हेमांगी कवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ही एक हलकीफुलकी विनोदी मालिका होती. सासू-सुनेतील नित्याची भांडणे, थोडीफार खोडसाळ चर्चा आणि त्यातून निर्माण होणारे प्रसंग यांची रंगतदार मांडणी यात करण्यात आली होती. आधुनिक विचारांच्या सासू आणि तितक्याच आधुनिक सून या दोघी एकत्र राहिल्यावर काय गमतीजमती घडतात, हे या मालिकेतून दाखवण्यात आले होते. ही मालिका फक्त मराठी या वाहिनीवर दाखवली जात होती. 2019 मध्ये झी मराठीवर प्रसारित झालेली मिसेस मुख्यमंत्री ही मालिका श्वेता शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाली होती. यात अमृता डोंगळे, तेजस बर्वे आणि हेमांगी कवी यांच्या भूमिका महत्त्वाच्या होत्या. या मालिकेत हेमांगीनं रागिणी शिंदे हे पात्र साकारले होते. गावी साधी राहणीमान असलेली रागिणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलावर प्रेम करते आणि त्याच्याशी विवाह करते. लग्नानंतर ती ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून ओळखली जाऊ लागते. या भूमिकेमुळे हेमांगीनं प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप पाडली.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या






















