एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 7 June: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 7 June: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

'आठवा रंग प्रेमाचा' सिनेमातील रिंकू राजगुरुचा लूक रिव्हील; ट्रेलर आऊट

काळ कितीही आधुनिक झाला, तरी स्त्रियांवरील अत्याचार हा सामाजिक प्रश्न आजही कायम आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचा प्रश्नाबरोबरच एका प्रेमकहाणीवर आधारित 'आठवा रंग प्रेमाचा' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 17 जूनला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात रिंकू राजगुरूनं अॅसिड व्हिक्टिमची भूमिका करत पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअप केला आहे.  

कमल हासनच्या 'विक्रम'चा महाविक्रम; तीन दिवसांत केली 160 कोटींची कमाई

कमल हासनचा 'विक्रम' सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या तीन दिवसांतच या सिनेमाने जगभरात 160 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने रिलीज आधीच 200 कोटींची टप्पा पार केला होता. जगभरात बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. 'विक्रम' सिनेमा 3 जून 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.

टॉम क्रूझच्या 'Top Gun Maverick' सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई

टॉम क्रूझचा 'टॉप गन मॅव्हरिक' हा सिनेमा रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यातदेखील सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धमाका केला आहे. या सिनेमाने जगभरात आतापर्यंत 4 हजार 284 कोटींची कमाई केली आहे.

150 कोटींच्या क्लबमध्ये भूल भुलैय्या-2 झाला सामील

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांच्या भूल भुलैय्या-2  या चित्रपटाचा 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले. पण तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट एवढा कमी वेळेत 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे त्यामुळे आता लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज लावला जातोय.

'धूप पानी बहने दे' केके यांचं शेवटचं गाणं रिलीज; चाहते झाले भावूक

गायक केके यांची अनेक गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच केके यांचं शेवटचं गाणं 'धूप पानी बहने दे' हे नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'धूप पानी बहने दे' हे गाणं ऐकून चाहते भावूक झाले आहेत.

20:25 PM (IST)  •  07 Jun 2022

Kon Honaar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार काजोल आणि तनुजा

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि लाडकी अभिनेत्री काजोल उपस्थित राहणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पहिल्यांदाच या मायलेकीचा अनोखा बंध पाहायला मिळणार आहे. एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर' (ADAPT)  या संस्थेसाठी त्या 'कोण होणार करोडपती' हा खेळ खेळणार आहेत. 

20:24 PM (IST)  •  07 Jun 2022

हळद लागली, हळद लागली... बिग बॉस फेम विशाल निकमची पोस्ट व्हायरल

‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 3) तिसरा सिझन प्रचंड गाजला. या पर्वात विशाल निकम (Vishal Nikam) याने संपूर्ण महाराष्ट्राची मने पुन्हा एकदा जिंकली. त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि तो या पर्वाचा महाविजेता ठरला. विशालची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

18:25 PM (IST)  •  07 Jun 2022

सलमान खानला मिळालेल्या पत्राचा तपास सुरू; दबंग खानने नोंदवला जबाब

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले असून त्या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता. सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास घेत आहेत. मुंबई पोलिसांनी आता सलमान, सलीम खान आणि बॉडी गार्डसह त्यांच्या संपर्कातील काही लोकांचा जबाब नोंदवला आहे. 

18:24 PM (IST)  •  07 Jun 2022

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार काजोल आणि तनुजा; उलगडणार मायलेकींचे बंध

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि लाडकी अभिनेत्री काजोल उपस्थित राहणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पहिल्यांदाच या मायलेकीचा अनोखा बंध पाहायला मिळणार आहे. एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर' (ADAPT)  या संस्थेसाठी त्या 'कोण होणार करोडपती' हा खेळ खेळणार आहेत. 

17:02 PM (IST)  •  07 Jun 2022

'धाकड'नंतर 'सम्राट पृथ्वीराज' बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज'  (Samrat Prithviraj) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. 3 जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा अयशस्वी ठरला आहे. आतापर्यंत या सिनेमाने फक्त 44.40 कोटींची कमाई केली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre Dasara Melava : दसरा मेळाव्यात ठाकरेंचा रोख नेमका कुणावर असणार? ABP MajhaZero Hour Guest Centre Dilip Khristi | दसरा मेळाव्यात बहीण भावाची ताकद एकत्र येणार!Zero Hour | यंदाचा दसरा मेळावा कोण गाजवणार? कोण फुंकणार विधानसभेचं रणशिंग?Zero Hour Guest Centre Manoj Jarange | घरी बसून चालणार नाही, सगळ्यांनी एकजुटींनी नारायणगडावर या!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Embed widget