(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Entertainment News Live Updates 4 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Pathaan : शाहरुख खान 'पठाण'ची रिलीज डेट बदलणार?
KRK On Pathaan Release Date : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'पठाण' (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता किंग खान या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Tunisha Sharma : तुनिषाच्या निधनानंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' मालिकेचा सेट बदलला
Ali Baba Dastaan E Kabul : तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' (Ali Baba Dastaan E Kabul) या मालिकेचं शूटिंग थांबलं होतं. तुनिषाने या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केल्याने सेटवर भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. पण शूटिंग थांबल्याने निर्मात्यांना मात्र मोठा फटका बसला होता. पण आता शो मस्ट गो ऑन म्हणत या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
Akshaya Deodhar : अक्षयाची रिअल लाईफ सासू दिसते कशी? जाणून घ्या...
Akshaya Deodhar : अक्षया देवधर (Akshaya Deodhar)
आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यानंतर पाठकबाईंची खऱ्या आयुष्यातील सासू नक्की कशी आहे याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. पण यातील एका फोटोने मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या फोटोत अक्षयासोबत एक महिला दिसत आहे. त्यामुळे आता ही महिला कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर ही महिला दुसरी-तिसरी कोणी नसून अक्षयाची सासू आहे.
Nawazuddin Siddiqui: 'त्यांनी मला 25 कोटी दिले तरी मी ते काम करणार नाही...'; नवाजुद्दीनच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
Nawazuddin Siddiqui: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेतानवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून नवाजुद्दीन हा प्रेक्षकांच्या भेटीस येतो. चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारुन अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात करणारा नवाजुद्दीन आता'लक्ष्मण लोपेज'(Laxman Lopez) या इंग्रजी भाषेतील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन त्याच्या करिअरबाबत सांगितलं.
Vaalvi Trailer : 'वाळवी'चा ट्रेलर क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा
Vaalvi Trailer Out : 'वाळवी' हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेली वाळवी आपल्याला परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' (Vaalvi) या सिनेमात पाहायला मिळणार आहे. यापूर्वीच या सिनेमाचा जबरदस्त टिझर अगदी अनोख्या पद्धतीनं प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यामुळे या सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार याविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात आता 'वाळवी'चा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
View this post on Instagram
Bigg Boss 16 : 'बिग बॉस'च्या घरात शिव ठाकरे पुन्हा प्रेमात
Bigg Boss 16 : सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 16'ची (Bigg Boss 16) क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता हा वादग्रस्त कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असून या पर्वात कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या पर्वात शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दु रोजिकने (Abdu Rozik) नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
View this post on Instagram
Nawazuddin Siddiqui: 'त्यांनी मला 25 कोटी दिले तरी मी ते काम करणार नाही...'; नवाजुद्दीनच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
Nawazuddin Siddiqui: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून नवाजुद्दीन हा प्रेक्षकांच्या भेटीस येतो. चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारुन अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात करणारा नवाजुद्दीन आता'लक्ष्मण लोपेज'(Laxman Lopez) या इंग्रजी भाषेतील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन त्याच्या करिअरबाबत सांगितलं.
Web Series : अॅक्शन आणि सस्पेन्सवर आधारित सीरिज आवडतात? पाहा नेटफ्लिक्सवरील या पाच सीरिज
The Top 5 Action Web Series : ओटीटीवरील (OTT) चित्रपट (Movie) आणि वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची पसंती मिळते. काही लोकांना रोमँटिक कथानकावर आधारित चित्रपट आवडतात तर काहींना अॅक्शन असणारे चित्रपट आवडतात. जर तुम्हाला अॅक्शन आणि सस्पेन्सवर आधारित वेब आवडत असतील तर तुम्ही नेटफ्लिक्सवरील (Netflix) या पाच वेब सीरिज पाहु शकता.
Tunisha Sharma Birthday : जाणून घ्या तुनिषा शर्मा कसा साजरा करणार होती बर्थडे...
Tunisha Sharma : तुनिषाच्या आईने सरप्राइडज बर्थडे पार्टीच्या तयारीला सुरुवात केली होती. तुनिषाचे खास मित्र-मंडळी या पार्टीला उपस्थित राहणार होते. चंदीगढमध्ये वाढदिवस साजरा करण्याची तुनिषाची इच्छा होती. त्यामुळे चंदीगढमध्येच तिचा वाढदिवस साजरा करण्यात येणार होता.