(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nawazuddin Siddiqui: 'त्यांनी मला 25 कोटी दिले तरी मी ते काम करणार नाही...'; नवाजुद्दीनच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन (Nawazuddin Siddiqui) त्याच्या करिअरबाबत सांगितलं.
Nawazuddin Siddiqui: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून नवाजुद्दीन हा प्रेक्षकांच्या भेटीस येतो. चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारुन अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात करणारा नवाजुद्दीन आता'लक्ष्मण लोपेज'(Laxman Lopez) या इंग्रजी भाषेतील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन त्याच्या करिअरबाबत सांगितलं.
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवाजुद्दीननं सांगितलं, 'मी चित्रपटात अनेक छोट्या भूमिका केल्या आहेत. मी माझ्या मेहनतीने हे स्थान मिळवले आहेत. आजच्या काळात मला कोणत्याही परदेशी चित्रपटाने छोटी भूमिका दिली तर मी ती कधीच करणार नाही. याबाबत मी शपथ घेतली आहे. त्या चित्रपटासाठी मला निर्मात्यांनी 25 कोटी रुपये दिले तरी मी ते काम करणार नाही. मला वाटते अभिनेत्यानं कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचे काम चांगले असेल तर तुम्हाला प्रसिद्धी आपोआप मिळेल.'
नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी चित्रपट
'लक्ष्मण लोपेज' या आगामी चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी हा महत्वाची भूमिका साकारणार आहे. तसेच त्याचा 'हड्डी' (Haddi) हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकीचा लूक रिलीज करण्यात आला होता. त्याच्या लूकनं अनेकांचं लक्ष वेधलं.
View this post on Instagram
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गँग ऑफ वासेपूर, मंटो या चित्रपटांना आणि सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नवाजुद्दीननं अनेक चित्रपटांसाठी कोट्यवधींचे मानधन घेतलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: