(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Entertainment News Live Updates 29 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
The Kerala Story: निर्मात्याने स्वतः सांगितले 32 हजार मुलींच्या लव्ह जिहादचे सत्य, ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!
The Kerala Story : निर्माता विपुल अमृतलाल शाह यांचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. या चित्रपटात 32,000 पीडित मुलींची वेदनादायक कहाणी मांडण्यात आली आहे, ज्यांना प्रथम लव्ह जिहादद्वारे इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले आणि नंतर ISIS मध्येही सामील होण्यास भाग पाडले गेले. या चित्रपटालाही एक वर्ग विरोध करतोय. काही लोक म्हणतात की हा चित्रपट फक्त एक अजेंडा आहे. त्याच्या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, केरळमध्ये असे कधीच घडले नाही. यावर आता विपुल शहा उघडपणे व्यक्त झाले आहेत.
Sooraj Pancholi: 'त्यासाठी' सूरजला दोषी धरणं चुकीचं; सूरज पांचोलीला निर्दोष ठरवताना कोर्टाने काय म्हटले?
Jiah Khan Case Sooraj Pancholi: बॉलीवूड अभिनेत्री जिया खान स्वतःच्या भावनांवर आवर घालण्यात अपयशी ठरली. त्यासाठी तिचा प्रियकर सूरज पांचोलीला जबाबदार ठरवता येणार नाही, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवून जियाच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीची मुंबई सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं. एखाद्या मुलीनं आत्महत्या करणं हे दुदैवीच आहे, मात्र त्यावेळी जिया ही तिच्या भावनांना बळी पडली होता. ती तिच्या नातेसंबंधात अकडून न राहता त्यातून बाहेर पडू शकली असती, पण तसं झालं नाही. तसेच आरोपीविरोधातील पुरावे हे संदिग्ध आणि साधारण स्वरूपाचे आहेत. जियाला आत्महत्या करण्यास सूरजने भाग पाडलं हे सिद्ध करणारा एकही ठोस पुरावा तपासयंत्रणा अथवा तक्रारदार सादर करू शकले नाहीत, असं सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी आपल्या 51 पानी आदेशात म्हटलेलं आहे.
Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा टीझर रिलीज
Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात पण आपलंच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
Armaan Jain Son : अरमान जैनच्या लेकाची पहिली झलक पाहा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Arman Jain Son : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा भाऊ अरमान जैन (Arman Jain) सध्या चर्चेत आहे. अरमानने त्याच्या लाडक्या लेकाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. अरमानने त्याच्या लेकाचं नाव 'राणा' असं ठेवलं आहे.
Maharashtra Din 2023 : 'या' दहा कलाकारांनी रसिक मनांवर राज्य केलं; जाणून घ्या महाराष्ट्रातील 'Top 10' कलाकार
Maharashtra Din 2023 : राज्यभरात 1 मे हा दिवस 'महाराष्ट्र दिन' (Maharashtra Din 2023) म्हणून साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांत सिनेसृष्टीत मराठी कलाकारांचं वर्चस्व दिसून आलं आहे.
Box Office : सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान'चा खेळ खल्लास; 'पोन्नियिन सेल्वन 2'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी कमावले फक्त 32 कोटी
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Ponniyin Selvan 2 Box Office Collection : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Jaan) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण कमाईच्या बाबतीत हा सिनेमा मागे पडला आहे. 'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 'किसी का भाई किसी की जान'चा खेळ खल्लास झाला आहे.
Dipika Chikhlia Love Story : रामायणातील 'सीतेला' तिच्या खऱ्या आयुष्यातला 'राम' कसा भेटला? दोन तासांची भेट अन् थेट निर्णय
Ramayan Dipika Chikhlia Love Story : दीपिका चिखलियाने (Dipika Chikhlia) अनेक हिंदी, दाक्षिणात्य आणि भोजपुरी सिनेमांत काम केलं आहे. पण 'रामायण' (Ramayan) मालिकेतील 'सीता'च्या भूमिकेमुळे दीपिकाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या 'रामायण' या पौराणिक मालिकेमुळे दीपिका चिखलिया हे नाव घराघरांत पोहोचलं. या मालिकेनंतर दीपिका सीता या नावानेच ओळखली जाऊ लागली. पण दीपिकाची लव्हस्टोरी तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या दीपिकाचा रिअर लाइफ राम कसा आहे...
Muskan Narang : फॅशन डिझायनर मुस्कान नारंगने वयाच्या 25 व्या वर्षी संपवलं आयुष्य
Moradabad Fashion Designer Muskan Narang Suicide : उत्तरप्रदेशातील मुरादाबाद (Moradabad) येथील लोकप्रिय फॅशन डिझायनर (Fashion Designer) मुस्कान नारंगने (Muskan Narang) आत्महत्या करत स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या करत तिने आयुष्य संपवलं आहे.