एक्स्प्लोर

Muskan Narang : फॅशन डिझायनर मुस्कान नारंगने वयाच्या 25 व्या वर्षी संपवलं आयुष्य

Muskan Narang : मुरादाबाद येथील फॅशन डिझायनर मुस्कान नारंगने आत्महत्या करत स्वत:चं आयुष्य संपवलं आहे.

Moradabad Fashion Designer Muskan Narang Suicide : उत्तरप्रदेशातील मुरादाबाद (Moradabad) येथील लोकप्रिय फॅशन डिझायनर (Fashion Designer) मुस्कान नारंगने (Muskan Narang) आत्महत्या करत स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या करत तिने आयुष्य  संपवलं आहे.

मुस्कान नारंगच्या वडिलांनी म्हणजेच चंद्रप्रकाश नारंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कान मुंबईवरुन आल्यापासून ती नैराश्याचा सामना करत असल्याचं मला जाणवलं होतं. ती आली तेव्हा आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं आणि झोपण्यासाठी ती तिच्या खोलीत निघून गेली. सकाळी आम्ही तिला आवाज दिला पण ती बाहेर आलीच नाही. त्यावेळी आम्ही खिडकीतून तिला डोकावून पाहिलं तेव्हा ती पंख्याला लटकलेली दिसून आली. 

मुंबईतून आल्यानंतर मुस्कान नैराश्यात असल्याचं आम्हाला जाणवायचं त्यानंतर आम्ही तिला समजावत असे. फॅशन डिझायनरच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहे. मुस्कानने आत्महत्या करण्याआधी सुसाइड नोट लिहिलेली नाही. पोलीस अधिकारी अखिलेश सिंह भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे". 

मुस्कानने दिल्लीत फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. त्यानंतर ती मुंबईतील एका कंपनीत फॅशन डिझायनर म्हणून काम करू लागली. आत्महत्या करण्याआधी मुस्कान सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिने आत्महत्या करत असल्याचे संकेत दिले होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Muskan Narang (@muskan_narang99)

मुस्कान या व्हिडीओमध्ये म्हणत आहे,"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओनंतर तुम्हाला मला पाहता येणार नाही. आपल्या अडचणी, समस्यां दुसऱ्यांना सांगितल्यामुळे आपल्याला हलकं वाटतं, असा चुकीचा समज आहे". 

नोकरी गेल्यामुळे मुस्कान नैराश्यात

मुस्कानच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुस्कान मुंबईतील एका चांगल्या कंपनीत फॅशन डिझायनर म्हणून काम करत होती. पण काही कारणांने तिची नोकरी गेली आणि ती नैराश्यात गेली. त्यानंतर घरच्यांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मुस्कानने आत्महत्या केल्यामुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. नोकरी गेल्यामुळे मुस्कान नैराश्यात गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अद्याप आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही. 

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates 29 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget