(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Latur Crime News: लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
Latur Crime News लातूर: लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु) येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्यध्यापकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. अनेक अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला असून गेल्या साडे तीन वर्षांपासून सुरु असणारे प्रकरण आता समोर आले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून संबंधित प्रभारी मुख्यध्यापकाचे निलंबनही करण्यात आले आहे.
अण्णा श्रीरंग नरसिंगे हा हरंगुळ येथील जिल्हा परिषद शाळेत प्रभारी मुख्यध्यापक म्हणून सेवा बजावत होता. मात्र मागील साडे तीन वर्षात अनेक अल्पवयीन मुलींशी असभ्य वागणे, कोणतेही कारण पुढे करुन मुलींशी संवाद साधणे, अश्लिल भाषा वापरणे, एवढेच नाहीतर अल्पवयीन मुलींना हातपाय आणि डोक्याची मालीश करण्यास सांगणे...असले संता पूजन करत होता. याबाबतीची चर्चा गावात वाढली. गावातील नागरिकांनी याबाबत तक्रार शिक्षण विभागाकडे केली. गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ याची दखल घेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. शिक्षण विभागाने दोषी शिक्षकास तात्काळ निलंबित केले आहे.
संबंधित बातमी:
ट्रक भरुन पैसे, नोटा मोजायला 36 मशीन, 10 दिवसांची रेड, भारतातील सर्वांत मोठा छापा; काय काय सापडलं?