एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 27 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 27 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले पुन्हा एकदा झलकणार रुपेरी पडद्यावर

'तो, ती आणि फुजी' हा रोमॅंटिक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठीतला प्रयोगशील दिग्दर्शक मोहित टाकळकर सांभाळणार आहे. भारत आणि जपानमध्ये घडणाऱ्या या प्रेमकहाणीमध्ये ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले मुख्य भूमिकेत आहेत.

'बस बाई बस'च्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे दिसणार नव्या भूमिकेत!

'बस बाई बस' या कार्यक्रमातून अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीस येणार आहे. 'बस बाई बस' हा कार्यक्रम 29 जुलैपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात काही सुप्रसिद्ध महिला व्यक्तिमत्व उपस्थित राहणार असून, सुबोध त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सुबोध भावे प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करत असतो. आता सुबोध स्त्रियांसाठी लेडीज स्पेशल बस घेऊन येणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही शाबासकी : नचिकेत बर्वे

सिनेमाला लोकप्रिय हिंदी सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नचिकेत म्हणाला,"राष्ट्रीय पुरस्कार मला जाहीर होणं हे खूप आनंददायी आहे. आपण जे काम करतो ते आपण प्रामाणिकपणे करत असतो. तान्हाजी हा ऐतिहासिक सिनेमा होता. या सिनेमासाठी खूप अभ्यास करावा लागला. मेहनत घ्यावी लागली होती. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे शाबासकी मिळण्यासारखं आहे".

'एकदा काय झालं' सिनेमाचा ट्रेलर आऊट

'एकदा काय झालं' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर प्रेक्षक या सिनेमाच्या ट्रेलरची अतुरतेने वाट बघत होते. ट्रेलरवरून वडिल-मुलाच्या नाजूक नात्याला या कथेतून स्पर्श केलेला दिसतो. तसेच गोष्ट प्रभावीपणे सांगणाऱ्या माणसाच्या आयुष्याचीच गोष्ट या सिनेमातून साकारण्यात आल्याचेही ट्रेलरमध्ये स्पष्ट होत आहे.

'कॉफी विथ करण'च्या मंचावर येणार विजय देवरकोंडा अन् अनन्या पांडे

सिने-निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचे सातवे पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या तीन भागांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आता चौथ्या भागात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे दिसणार आहेत.

17:00 PM (IST)  •  27 Jul 2022

Disha-Tiger Breakup: दिशा आणि टायगरचं झालं ब्रेकअप? जॅकी श्रॉफ म्हणाला...

Disha-Tiger Breakup : बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख असणारी  दिशा पटानी (Disha patani) आणि अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमी होत असतात. अनेक वेळा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान किंवा कार्यक्रमांमध्ये दिशा आणि टायगरनं त्यांच्या नात्याबद्दल बोलणं टाळलं. सध्या या दोघांचं ब्रेक-अप झालं आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दोघे जवळपास सहा वर्ष एकमेकांना डेट करत होते. दिशा आणि टायगरच्या ब्रेक-अपच्या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.   

वाचा सविस्तर बातमी 

15:39 PM (IST)  •  27 Jul 2022

Alia Bhatt On Twins : रणबीर कपूरनं जुळ्या मुलांबाबत केलेल्या वक्तव्यावर आलियाची रिअॅक्शन; म्हणाली...

Ranbir Alia : सध्या सगळीकडेच अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या जोडीची चर्चा सुरु आहे.  काही दिवसांपूर्वी या जोडीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. रणबीर आणि आलिया लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यापासून सगळे चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत दिलेल्या उत्तरानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. रणबीरनं दिलेल्या एका उत्तरामुळे त्यांच्या घरात एक नव्हे, तर दोन चिमुकले पाहुणे येणार असल्याचा अंदाज चाहते बांधत होते. रणवीरच्या जुळ्या मुलांच्या वक्तव्यावर आता आलियानं प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा सविस्तर बातमी 

14:09 PM (IST)  •  27 Jul 2022

Do Baaraa First Look : क्लासी आणि बॉसी.. ‘दो बारा’मधील तापसी पन्नूचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला!

Do Baaraa Taapsee Pannu First Look : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या तिच्या ‘दो बारा’ (Do Baaraa) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच तिच्या या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. आता या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक देखील प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तापसी आणि दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यप (Anurag kashyap) पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात तापसी पन्नू पुन्हा एकदा एका हटके भूमिकेत दिसणार आहे.

वाचा संपूर्ण बातमी

13:29 PM (IST)  •  27 Jul 2022

गाणं अन् आनंदाचा सोहळा नेमका कशासाठी? ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत अनपेक्षित येणार मोठा ट्विस्ट!

Tu Tevha Tashi : झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासून पसंती दर्शवली. या मालिकेतील अनामिका आणि सौरभची अव्यक्त प्रेमकथा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. आता प्रेक्षकांना मालिकेत लवकरच एक आश्चर्यकारक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत अनामिका आणि पट्याच्या प्रेमकहाणी सोबत नील आणि राधाची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांना पाहायला आवडतेय. अनामिका सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले असतानाच, मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसणार आहेत.

वाचा संपूर्ण बातमी

12:55 PM (IST)  •  27 Jul 2022

IFFM : अभिषेक बच्चन आणि कपिल देव ऑस्ट्रेलियामध्ये फडकवणार तिरंगा; मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये लावणार हजेरी

IFFM : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) हे आता भारताचा झेंडा इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नमध्ये (IFFM) फडकवणार आहेत.  

वाचा सविस्तर बातमी 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit pawar On Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीतून अजित पवार १० मिनिटांत निघून गेले #abpमाझाBopdev Ghat Case Update : सीसीटीव्हीमध्ये सापडू नये यासाठी आपोरींकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्नSambhaji raje Chhtrapati : संभाजीराजेंच्याा नेतृत्वात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष विधानसभा लढवणारPune Bopdev Ghaat : बोपदेव घाट प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Nana Patole : 'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
The Nobel Prize Nihon Hidankyo : हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
Embed widget