IFFM : अभिषेक बच्चन आणि कपिल देव ऑस्ट्रेलियामध्ये फडकवणार तिरंगा; मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये लावणार हजेरी
इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नमध्ये (IFFM) अभिषेक बच्चन आणि कपिल देव हे हजेरी लावणार आहेत.
IFFM : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) हे आता भारताचा झेंडा इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नमध्ये (IFFM) फडकवणार आहेत.
अभिषेक बच्चनला मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये आमंत्रित करण्यात आलं आहे. याबाबात त्यानं सांगितलं, 'सिनेमाच्या उत्सवात भाग घेण्यासाठी आमंत्रित केलं जाणं, हा खूप मोठा सन्मान आहे. मेलबर्नमधील भारतीय स्वातंत्र्याच्या प्रतिष्ठित फेडरेशन स्क्वेअरवर भारताचा ध्वज फडकवणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण ऑस्ट्रेलियातील भारतीय एकत्र येणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मैत्रीचे हे प्रतिक आहे. कपिल सरांसोबत एका स्टेज शेअर करणं, ही गोष्ट माझ्यासाठी खास आहे. क्रिकेट आणि सिनेमा यांच्यामधील मैत्रीचे हे प्रतिक आहे. या दोन्ही गोष्टींनी भारताला जोडलं आहे. भारतीयांचा हा उत्सुव साजरा करण्यासाठी मी उत्सुक आहे. हा ऐतिहासिक क्षण असणार आहे.'
कपिल देव यांना देखील या फिल्म फेस्टिवलचे आमंत्रण देण्यात आलं आहे. हे फिल्म फेस्टिवल 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. 2020 आणि 2021 या वर्षात हे फिल्मफेस्टिवल व्हर्जुअली झालं होतं. भारताच्या बाहेर आयोजित होणारा हा सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव आहे. चित्रपट महोत्सवात समीक्षकांची पसंती मिळालेल्या 100 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन केले जाते. या महोत्सवाची सुरुवात अनुराग कश्यप दिग्दर्शित तापसी पन्नूच्या दोबारा या चित्रपटाने होणार आहे. हा चित्रपट 19 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.
हेही वाचा :