एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Entertainment News Live Updates 25 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 25 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.   

Elnaaz Norouzi : सेक्रेड गेम्स फेम एलनाज नौरोजीकडून अनोख्या पद्धतीने हिजाब चळवळीचं समर्थन 

Elnaaz Norouzi : इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.  विविध सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून इराणमधील हिजाब चळवळीचं समर्थन केलं जात आहे. सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील अभिनेत्री एलनाज नौरोजीने (Elnaaz Norouzi) देखील अनोख्या पद्धतीने या चळवळीचे समर्थन केले असून हिजाबच्या वादात इराणमध्ये मारल्या गेलेल्या महशा अमिनीच्या मृत्यूचा अनोख्या पद्धतीने निषेध केला असून एक खास संदेश देण्याचा प्रयत्न केलाय.  एलनाज नौरोजी आज जर्मनीहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. त्यावेळी तिने समोरच्या बाजूला 'वुमन-लाइफ-फ्रीडम' आणि 'फ्री-इराण' असे लिहिलेला टी-शर्ट घातला होता

ब्रह्मास्त्र या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार 

आज (रविवारी 23 ऑक्टोबर) रोजी, OTT अॅप डिस्ने प्लस हॉटस्टारनच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला आहे. यासोबतच या पोस्टमध्ये ब्रह्मास्त्रच्या ओटीटी रिलीज डेटचीही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील महिन्यात 4 नोव्हेंबर रोजी ब्रह्मास्त्र OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होईल. ब्रह्मास्त्रचा चित्रपट निर्माता करण जोहरनेही हीच पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. आणि म्हटले आहे की, मोठ्या पडद्यापासून तुमच्या हृदयापर्यंत आणि आता तुमच्या पडद्यावर या वर्षातील सर्वात हिट हिंदी चित्रपट ब्रह्मास्त्र ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. ब्रह्मास्त्रच्या ओटीटी रिलीजच्या घोषणेने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Alia Bhatt : प्रेग्नंट असल्यामुळे आलिया भट्ट दिवाळी साजरी करत नाही? फोटो शेअर करत केला खुलासा 

मुंबई: आलिया आणि रणबीरसाठी यंदाची दिवाळी विशेष आहे, खासकरून आलिया भट्ट साठी. कारण या वर्षी बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकले नाहीत, पण आलिया भट्टचा गंगूबाई कठियावाड़ी (Gangubai Kathiawadi) आणि ब्रह्मास्त्र (Brahmāstra) या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर जादू केली. तसेच पहिल्यांदाच आलियाने रणबीरसोबत ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या माध्यमातून एकत्रित काम केलं. आलिया आणि रणबीरसाठी यंदाचं वर्ष आणखी एका कारणासाठी स्पेशल आहे. ते म्हणजे त्यांच्या घरी आता लहान पाहुण्याचं आगमन होणार आहे. म्हणूनच आलिया यंदाची दिवाळी दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात साजरी करू शकत नाही. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली आहे. 

14:30 PM (IST)  •  25 Oct 2022

The Ghost OTT Release: अभिनेते नागार्जुन यांचा 'द घोस्ट' ओटीटीवर होणार रिलीज; 'या' प्लॅटफॉर्मवरुन येणार प्रेक्षकांच्या भेटीस

The Ghost Release On OTT: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन (Akkineni Nagarjuna) यांचा द घोस्ट (The Ghost) हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात नागार्जुन यांच्यासोबतच अभिनेत्री सोनल चौहाननं (Sonal Chauhan) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर नागार्जुन यांच्या या चित्रपटाला यश मिळालं नाही पण आता ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस येऊन हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. 

नेटफ्लिक्सच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे माहिती देण्यात आली आहे की, नागार्जुन आणि सोनल चौहान यांच्या द घोस्ट या चित्रपटाचं ऑनलाइन स्ट्रीमिंग 2 नोव्हेंबरपासून होणार आहे.  ज्यांनी अद्याप द घोस्ट पाहिला नाही, ते आता या नागार्जुन यांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर घरबसल्या पाहू शकतात. 

14:05 PM (IST)  •  25 Oct 2022

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडले 'नॉमिनेशन रॉकेट' टास्क; हे स्पर्धक झाले नॉमिनेट

Bigg Boss Marathi 4:  'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) घरामध्ये काल पार पडले “नॉमिनेशन रॉकेट” हे नॉमिनेशन कार्य. नॉमिनेशन कार्याअंती या आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये किरण, अमृता देशमुख, त्रिशूल, विकास, योगेश, आणि प्रसाद हे सदस्य नॉमिनेट झाले. आता या आठवड्यात कोणत्या सदस्याला घराबाहेर पडावे लागेल, कोणाचा प्रवास संपणार हे या रविवारी कळेलच. नॉमिनेशनमध्ये आल्याने विकास जरा नाराज आहे आणि त्याच संदर्भात आज अपूर्वा त्याच्याशी संवाद साधताना दिसणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

12:52 PM (IST)  •  25 Oct 2022

Ram Setu Twitter Review: कसा आहे अक्षयचा राम सेतू? चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी रिअॅक्शन

Ram Setu Twitter Review: बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमारनं  (Akshay Kumar)  त्याच्या चाहत्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. त्याचा राम सेतू (Ram Setu) हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत असून अनेकांनी या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

11:19 AM (IST)  •  25 Oct 2022

Jaya Bachchan : पुन्हा भडकल्या जया बच्चन; घराबाहेरील फोटोग्राफर्सचा केला पाठलाग, पाहा नेमकं काय घडलं?

Jaya Bachchan: अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan)  या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. पण गेल्या काही दिवसांपूर्वी त्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी जया बच्चन  यांनी मुंबईमधील पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्या काही फोटोग्राफर्सवर भडकल्या होत्या.  आता पुन्हा जया बच्चन या फोटोग्राफर्सवर भडकल्या आहेत. नुकताच जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  घराबाहेर फोटो काढण्यासाठी आलेल्या फोटोग्राफर्सवर जया बच्चन या भडकल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

10:05 AM (IST)  •  25 Oct 2022

Prabhas: चित्रपटगृहातच फटाके फोडल्याने सीट्सला लागली आग; प्रभासच्या चित्रपटाच्या शो दरम्यान घडली घटना

Prabhas:  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता  प्रभास (Prabhas)  हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. रविवारी (23 ऑक्टोबर) प्रभासचा वाढदिवस होता. चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अनेक सेलिब्रिटींनी देखील प्रभासच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केल्या होत्या. प्रभासच्या वाढदिवसाला आंध्र प्रदेश येथील एका थिएटरमध्ये त्याच्या बिल्ला (Billa) या चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभासच्या काही उत्साही चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget