Entertainment News Live Updates 25July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jul 2022 05:16 PM
Ranveer Singh : न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह विरोधात चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; भावना दुखावल्याचा आरोप

Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव अर्थात रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. त्याच्या न्यूड फोटोशूटने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. त्याच्या फोटोशूटचे काहींनी कौतुक केलं तर काहींनी टीका केली. आता न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; अविनाश खोटं बोलून पुन्हा नेहाला फसवणार?

मालिकेच्या विशेष भागात अविनाश परीचा ड्रायव्हर असल्याचे सत्य नेहासमोर आले आहे. अविनाश तिचा पहिला नवरा असल्याचे सत्य नेहाने यशला सांगण्याआधीच अविनाश यशला फोन करून सांगतो, "मी परीचा ड्रायव्हर अविनाश...मला कॅन्सर झाला आहे". त्यामुळे यश अविनाशला मदत करण्याचे ठरवतो.

'पठाण' सिनेमातील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लुक आऊट

Deepika Padukone First Look From Pathaan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या 'पठाण' (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच 'पठाण' सिनेमातील दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) फर्स्ट लुक आऊट झाला आहे. 



Vicku Kaushal, Katrina Kaif : कतरिनला-विकीला धमकी देणारा अवघ्या 5 तासांत अटकेत; सांताक्रूझ पोलिसांची कारवाई

Vicku Kaushal, Katrina Kaif : अभिनेता  विकी कौशलनं (Vicku Kaushal) सांताक्रूझ (Santacruz) पोलीस स्टोशनमध्ये एका व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली. विकीची पत्नी कतरिना कैफला (Katrina Kaif)  एक व्यक्ती सोशल मीडियावर स्टॉक करत होता. या व्यक्तीच्या विरोधात विकीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. विकीनं सकाळी सहा वाजता सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्ती विरोधात तक्रार नोंदवली. अवघ्या पाच तासांमध्ये सांताक्रूझ पोलिसांनी आरोपी मनविंदर सिंहला मालाडमधून अटक केली.  मनविंदर सिंह हा लखनऊमध्ये राहणारा आहे. उद्या वांद्रे कोर्टात आरोपीला हजर करणार आहेत. 


वाचा सविस्तर बातमी

Darlings Trailer : 'डार्लिंग्स' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; पतीच्या अत्याचाराविरोधात लढणाऱ्या पत्नीची कहाणी

Darlings Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  आलिया भट (Alia Bhatt) तिच्या अभिनयानं सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटातील आलिच्या अभिनयाचं अनेकांची कौतुक केलं. आता लवकरच आलियाचा 'डार्लिंग्स' (Darlings) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये आलियानं प्रमुख भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, आलिया ही स्वत:च्या पतीचे अपहरण करुन पोलिसांकडे तक्रार करायला जाते. 'डार्लिंग्स' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 


पाहा ट्रेलर: 



Shivpratap Garujhep : 'बम बम भोले'; अमोल कोल्हेंच्या 'शिवप्रताप गरूडझेप' चित्रपटातील गाणे रिलीज

Shivpratap Garujhep : अभिनेता अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या शिवप्रताप-गरुडझेप (Shivpratap Garujhep) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दोन टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या दोन्ही टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटामधील 'बम बम भोले' हे गाणं रिलीज झालं आहे. 


पाहा गाणे: 


Shivpratap Garujhep : 'बम बम भोले'; अमोल कोल्हेंच्या 'शिवप्रताप गरूडझेप' चित्रपटातील गाणे रिलीज

Shivpratap Garujhep : अभिनेता अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या शिवप्रताप-गरुडझेप (Shivpratap Garujhep) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दोन टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या दोन्ही टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटामधील 'बम बम भोले' हे गाणं रिलीज झालं आहे. 


पाहा गाणे: 


मेरी ख्रिसमस’च्या शूटिंगला सुरुवात, विजय सेतुपतीसोबतचे फोटो शेअर करत कतरिनाने दाखवली सेटची झलक!

Vijay Sethupathi, Katrina Kaif : दिग्दर्शक श्रीराम राघवन (Sriram Raghavan) यांच्या आगामी ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Khristmas) चित्रपटात अभिनेता विजय सेतुपतीसोबत (Vijay Sethupathi) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार,  या दोघांनी काही काळापूर्वीच चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. आता टीम ‘मेरी ख्रिसमस’च्या पुढील शेड्यूलसाठी सज्ज झाली आहे. नुकतेच कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि सहकलाकार विजय सेतुपती यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.


वाचा संपूर्ण बातमी 

Dhanush : 'फक्त साऊथ अभिनेता नाही, भारतीय अभिनेता म्हणा'; धनुषनं व्यक्त केली नाराजी

Dhanush Reaction On Calling Him As South Actor : अभिनेता धनुषनं (Dhanush) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. धनुष आता हॉलिवूड चित्रपटसृष्टीतमध्ये देखील काम करणार आहे. त्याचा 'द ग्रे मैन' (The Grey Man) हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता धनुषच्या या हॉलिवूड चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. धनुषला दाक्षिणात्य चित्रपटांमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. अनेक जण धनुषला साऊथ अभिनेता म्हणतात. या गोष्टीवर धनुषनं नाराजी व्यक्त केली आहे. 


वाचा सविस्तर बातमी

Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंहला मिळाली आयुष्यभराची जोडीदार!

Akanksha Puri : अभिनेत्री आकांक्षा पुरी 'स्वयंवर : मिका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) या रिअॅलिटी शोची विजेती ठरली आहे. या शोच्या माध्यमातून स्वत:साठी जोडीदाराच्या शोधात असलेल्या मिका सिंहने (Mika Singh) तिची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. शोमध्ये वाईल्डकार्ड स्पर्धक म्हणून आलेली आकांक्षा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. आता तिने हा शो जिंकल्याने लवकरच मिका सिंह तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. आकांक्षा पुरीने (Akanksha Puri) अंतिम फेरीत प्रांतिका दास आणि नीत महल यांना पराभूत करून मिकाच्या हृदयात स्वतःची जागा पक्की केली.


वाचा संपूर्ण बातमी

Vicky Kaushal, Katrina Kaif : कतरिनाला सोशल मीडियावर स्टॉक करणाऱ्याविरोधात विकीची पोलिसात धाव; विकीलाही धमकी दिल्याची माहिती

Vicky Kaushal, Katrina Kaif : अनेक वेळा काही युझर्स सेलिब्रिटींना सोशल मीडियावर स्टॉक करतात. आता एका व्यक्तीनं अभिनेत्री कतरिना कैफला (Katrina Kaif) स्टॉक केल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता विकी कौशलनं (Vicku Kaushal) सांताक्रूझ (Santacruz) पोलीस स्टोशनमध्ये या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विकीची पत्नी कतरिना कैफला एक व्यक्ती सोशल मीडियावर स्टॉक करत होता. या व्यक्तीच्या विरोधात विकीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 


 वाचा संपूर्ण बातमी 

Ranveer Singh,Deepika Padukone : रणवीरचं न्यूड फोटोशूट पाहून दीपिका झाली इम्प्रेस; अशी दिली रिअॅक्शन

Ranveer Singh,Deepika Padukone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) चित्रपटांमधील अभिनयाबरोबरच त्याच्या वेगवेगळ्या अतरंगी लूकमुळे देखील चर्चेत असतो. त्याच्या अतरंगी लूकला त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते तर काही नेटकरी त्याला ट्रोल देखील करतात. आत्ता चक्क रणवीरनं न्यूड फोटोशूट केलं आहे. या न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंह चर्चेत आहे. काहींनी रणवीरच्या या फोटोशूला कमेंट करुन त्याला ट्रोल केलं तर काहींनी त्याचं कौतुक केलं. आता रणवीरची पत्नी दीपिका पादुकोणनं (Deepika Padukone) रणवीरच्या या न्यूडफोटोवर कशी रिअॅक्शन दिली असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात दीपिकाच्या रिअॅक्शनबाबत.... 


वाचा सविस्तर बातमी 

Shamshera BO Collection: बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरची जादू काही केल्या दिसेना! ‘शमशेरा’च्या कमाईचा आकडा कमीच!

Shamshera BO Collection : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ (Shamshera) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच काळानंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि वाणी कपूर (Vani Kapoor) मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. हा चित्रपट 22 जुलै रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. रिलीजपूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगद्वारे चित्रपटाने काही कमाई केली होती. ‘शमशेरा’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी अवघ्या 10.05 कोटींची कमाई केली होती. निर्मात्यांसह, प्रेक्षकांना देखील या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. चित्रपट निर्मात्यांना आठवड्याच्या शेवटी कमाई वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, चित्रपटाच्या कमाईत विशेष बदल झालेला नाही.


वाचा संपूर्ण बातमी

‘त्याने मोकळ्या मनाने जगायला शिकवलं’, संजना सांघीने शेअर केल्या सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या चित्रपटाच्या आठवणी!

2 Years Of Dil Bechara: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' (Dil Bechara) रिलीज होऊन आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुशांतसोबत अभिनेत्री संजना सांघी (Sanjana Sanghi) मुख्य भूमिकेत दिसली होती. आता या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये या चित्रपटाची एक छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून सुशांतचे चाहते त्याच्या आठवणीत भावूक झाले आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री ठरली नयनतारा, एका चित्रपटासाठी आकारतेय ‘इतके’ मानधन!

South Actress Nayanthara Income: साऊथ फिल्म इंडस्ट्रीची ‘लेडी सुपरस्टार’ अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) सध्या तिच्या कमाईमुळे खूप चर्चेत आली आहे. नयनतारा ही साऊथ सिनेसृष्टीतील टॉप आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकताच अभिनेत्रीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. लग्न आणि हनिमून साजरा केल्यानंतर आता अभिनेत्री लवकरच तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी अभिनेत्रीने भरमसाठ फी आकारली आहे. यामुळे नयनतारा आता साऊथची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

बिग बॉसच्या मराठीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! चौथा सीझन लवकरच येणार भेटीला

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसरा सीझन संपल्यापासून प्रेक्षक चौथ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. आता कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा पहिला प्रोमो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


बिग बॉसच्या मराठीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! चौथा सीझन लवकरच येणार भेटीला


बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसरा सीझन संपल्यापासून प्रेक्षक चौथ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. आता कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा पहिला प्रोमो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.


ब्लॅक पँथर: वकांडा फॉरएव्हर’च्या टीझरमध्ये दिसली चॅडविक बोसमनची झलक!


‘ब्लॅक पँथर’च्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मार्व्हल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 'ब्लॅक पँथर’ हा एक अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे, जो मार्वल कॉमिक्सच्या ब्लॅक पँथरच्या पात्रावर आधारित आहे. 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर' हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे.


आलिया-रणबीरच्या 'केसरिया' गाण्याने केला रेकॉर्ड


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने सर्वाधिक व्ह्यूजचा रेकॉर्ड केला आहे.


'द सॅंडमॅन'चा ट्रेलर आऊट


नेटफ्लिक्सवर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. अशाच वेगळ्या विषयावर भाष्य करणारी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द सॅंडमॅन' असे या वेबसीरिजचे नाव आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.


गौरी खानने चाहत्यांना दाखवली मन्नतची झलक


बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानप्रमाणेच गौरी खानदेखील लोकप्रिय आहे. गौरी खान सिनेमांत काम करत नसली तरी ती बॉलिवूडची एक नामांकित इंटीरियर डिजायनर आहे. तसेच ती शाहरुखच्या रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊसचे कामदेखील सांभाळते. 'मन्नत'चा एक-एक कोपरा गौरीने सजवला आहे. अशातच आता गौरीने 'मन्नत'मधील काही फोटो शेअर करत चाहत्यांना 'मन्नत'ची झलक दाखवली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.