एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Entertainment News Live Updates 24 July: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 24 July: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आर. माधवनचा 'रॉकेट्री' ओटीटीवर होणार रिलीज

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन सध्या 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा चर्चेत आला होता. 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये या सिनेमाचा प्रीमिअर झाला होता. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

अमिताभ बच्चनच्या 'गुडबाय'ची रिलीज डेट जाहीर

अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना सध्या 'गुडबाय' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. त्यांचा 'गुडबाय' हा सिनेमा 7 ऑक्टोबर 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

विनाकारण ट्रोल करू नका; रणवीर भावाला 'व्हिलन'चा सपोर्ट

बॉलिवूडचा बाजीराव अर्थात अभिनेता रणवीर सिंह सध्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर रणवीरचे न्यूड फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. नेटकरी एकीकडे रणवीरचे कौतुक करत आहेत तर दुसरीकडे त्याच्यावर टीकादेखील करत आहेत. मात्र अभिनेता अर्जुन कपूरने रणवीरला पाठिंबा दिला आहे.

‘डंकी’च्या चित्रीकरणासाठी ‘किंग’ शाहरुख खान लंडनमध्ये!

बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खान याने एप्रिलमध्येच त्याच्या आगामी प्रोजेक्ट 'डंकी'ची घोषणा केली होती. अभिनेत्याच्या या घोषणेनंतर त्याचे चाहते आणि प्रेक्षक खुश झाले होते. त्याच्या या आगामी चित्रपटाचे शूटिंग आधीच सुरू झाले असून, शाहरुख खान या चित्रपटाच्या सीक्वन्स शूट करण्यासाठी लंडनला पोहोचला आहे. नुकतेच त्याच्या या शूटच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या चित्रपटातील अभिनेता शाहरुख खान याचा हा लूक पाहून चाहते खुश झाले आहे.

'भाभीजी घर पर है' फेम अभिनेता दीपेश भान यांचे निधन

‘भाभी जी घर पर हैं’या मालिकेत ‘मलखान’ची भूमिका साकारणारे अभिनेते दीपेश भान यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपेश क्रिकेट खेळत होते आणि अचानक बेशुद्ध होऊन पडले. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. सोशल मीडियावर ‘मलखान’च्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेता दीपेश भान यांच्या निधनाने अवघ्या टीव्ही विश्वात शोककळा पसरली आहे.

19:01 PM (IST)  •  24 Jul 2022

The Sandman Trailer : 'द सॅंडमॅन'चा ट्रेलर आऊट

Netflix The Sandman Trailer : नेटफ्लिक्सवर (Netflix) नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. अशाच वेगळ्या विषयावर भाष्य करणारी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द सॅंडमॅन' (The Sandman) असे या वेबसीरिजचे नाव आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

18:21 PM (IST)  •  24 Jul 2022

SRK's Mannat Pics : गौरी खानने चाहत्यांना दाखवली मन्नतची झलक

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानप्रमाणेच (Shah Rukh Khan) गौरी खानदेखील (Gauri Khan) लोकप्रिय आहे. गौरी खान सिनेमांत काम करत नसली तरी ती बॉलिवूडची एक नामांकित इंटीरियर डिजायनर आहे. तसेच ती शाहरुखच्या रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊसचे कामदेखील सांभाळते. 'मन्नत'चा एक-एक कोपरा गौरीने सजवला आहे. अशातच आता गौरीने 'मन्नत'मधील काही फोटो शेअर करत चाहत्यांना 'मन्नत'ची झलक दाखवली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

16:50 PM (IST)  •  24 Jul 2022

KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती 14'चा 7 ऑगस्टला होणार प्रीमियर

Kaun Banega Crorepati 14 Premier Date : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या लोकप्रिय कार्यक्रमाचा प्रीमियर 7 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी प्रीमियरला हजेरी लावणार आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

16:18 PM (IST)  •  24 Jul 2022

मराठी मालिकांचा रंगणार एक तासाचा विशेष भाग

'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) आणि 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) या दोन्ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. आज रविवारी या दोन्ही मालिकांचा एक तासाचा विशेष भाग होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 

14:59 PM (IST)  •  24 Jul 2022

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने साकव बांधावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक जिल्हा प्रशासनाला निर्देश

मुंबई  - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीने नव्याने पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सावरपाडा गावातील वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तहसिलदारांसह इतर अधिकारी यांनी आज पाहणी केली. या पाहणीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी मागवून घेतला होता. त्यानुसार लगेचच पाऊले उचलत नवीन पुलाच्या उभारणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सावरपाडा गावातील गावकऱ्यांच्या पूल, रस्ते आदी समस्यांची गंभीरपणे दख़ल घेतली जाईल.  पुढील काही दिवसांत गावांत सकारात्मक बदल दिसतील असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी गावकऱ्यांना दिला आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?Rohit Pawar On Ram Shinde | देवेंद्र फडणवीसांनी पैसे वाटलेत तरीही राम शिंदेंचा पराभव- रोहीत पवारSanjay Shirsat on Cabinet | भाजपकडे चांगली आकडेवारी त्यामुळे मंत्रिपद कमीजास्त होईल- संजय शिरसाटABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Embed widget