Entertainment News Live Updates 2 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Jun 2022 09:10 PM
‘व्हॅक्यूम क्लीनर’ नाटकाचा रंगणार विनामुल्य सन्मान प्रयोग; अशोक सराफ यांचा केला जाणार विशेष सन्मान

मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने शनिवारी 4 जूनला दादरच्या शिवाजी मंदिरात अशोक सराफ यांच्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’ (Vacuum Cleaner) या नाटकाचा खास प्रयोग रंगणार आहे. या प्रयोगाच्या मध्यांतरात अशोक सराफ यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.

प्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे निधन

जगप्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी (Santoor Maestro Pandit Bhajan Sopori) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून संतूर वादक पंडित भजन सोपोरी आजारी होते. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

उत्तरप्रदेशनंतर मध्यप्रदेशमध्येदेखील 'सम्राट पृथ्वीराज' करमुक्त होणार; शिवराज सिंह चौहन यांची माहिती

 मध्यप्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश सरकारने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा सिनेमा करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

'कोण होणार करोडपती' 6 जूनपासून होणार सुरू

 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'कौन बनेगा करोडपती'नंतर 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता पुन्हा एकदा हा बहुचर्चित कार्यक्रम 6 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2'चा दबदबा

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यातदेखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या सिनेमा लवकरच 150 कोटींचा टप्पा पार करणार आहे. रिलीजच्या तेराव्या दिवशी या सिनेमाने 4.45 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर आतापर्यंत या सिनेमाने 150 कोटींची कमाई केली आहे. 

Vikram : विक्रम चित्रपटासाठी कमल हसननं घेतलं कोट्यवधींचे मानधन; जाणून घ्या इतर कलाकांची फी

Vikram :  विक्रम या चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच 200 कोटींची कमाई केली आहे. अॅडव्हान्स बुकिंग आणि ओटीटी राइट्मधून विक्रम या चित्रपटानं एवढी कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटामधील कलाकारांच्या मानधनाबाबत... 


वाचा सविस्तर बातमी 

उत्तर प्रदेशमध्ये 'सम्राट पृथ्वीराज' करमुक्त होणार; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा सिनेमा उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासाठी 'सम्राट पृथ्वीराज'चे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. 

'केजीएफ 2' यशस्वी घोडदौड! चित्रपटगृहात पूर्ण केले 50 दिवस

'केजीएफ 2' या सिनेमात यश, संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. प्रशांत नील यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा कन्नड, तामिळ, तेलुगू, हिंदी आणि मल्याळम अशा पाच भाषेत प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'केजीएफ 2' सिनेमात यश मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहात 50 दिवस पूर्ण केले आहेत.

पुन्हा एकदा एकत्र दिसले हृतिक, सुझैन आणि अर्सलान

पुन्हा एकदा एकत्र दिसले हृतिक, सुझैन आणि अर्सलान!


 





Shakira, Gerard Piqué : जेरार्ड पिककडून प्रेमात धोका! पॉपस्टार शकीरा मोडणार 12 वर्षाचं नातं

Shakira, Gerard Piqué : ‘वाका वाका गर्ल’ अर्थात पॉपस्टार शकीरा (Shakira) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. फुटबॉलपटू जेरार्ड पिक (Gerard Piqué) आणि शकीरा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शकीरा आणि जेरार्ड ही जोडी 2010पासून एकत्र आहे. या जोडीला दोन मुलंही आहेत. मात्र, आता जेरार्डने शकीराची फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे, त्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे. इतकचं नाही तर, दोघेही लवकरच वेगळे होणार असल्याचेही सांगितले जात आहे.


मीडिया रिपोर्टनुसार गेल्या काही आठवड्यांपासून जेरार्ड त्याची जोडीदार शकीरापासून वेगळा राहत आहे. शकीराने काही आठवड्यांपूर्वी जेरार्डला एका महिलेसोबत पकडले होते. प्रेमात फसवणूक झाल्याचं कळताच शकीराने आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.


वाचा संपूर्ण बातमी

गायक केके अनंतात विलिन

गायक केके अनंतात विलिन. मुलाने दिला अग्नी. केकेच्या अखेरच्या प्रवासात त्यांचे सर्व चाहते उपस्थित होते. यावेळी त्यांचे चाहते खूपच भावूक झाले होते. या अखेरच्या प्रवासात 'केके अमर रहे'च्या घोषणाही देण्यात आल्या.

रिलीज होण्याआधीच अक्षयच्या 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाला मोठा झटका; या देशात सिनेमा झाला बॅन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री  मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) यांच्या सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj)हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. तीन जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. पण रिलीज होण्याआधीच हा चित्रपट दोन देशांमध्ये बॅन करण्यात आला आहे. एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुवेत आणि ओमान या देशांमध्ये सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट बॅन करण्यात आला आहे.


गायक केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले कलाकार

अभिजित भट्टाचार्य, श्रेया घोषाल, जावेद अली, सलीम मर्चंट यांच्यासह केकेचे अनेक मित्र आणि इंडस्ट्रीतील कलाकार, गायक केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहचले आहेत.


 

संगीत विश्व आणि चित्रपटसृष्टीतील मंडळी केके यांच्या निवासस्थानी दाखल

कबीर खान, सुलेमान, श्रेया घोषाल, शंतनु मोहित्रा, अल्का याग्निक, गीतकार समीर, जतीन पंडीतसारखे संगीत विश्व आणि चित्रपटसृष्टीतील मंडळी केके यांच्या निवासस्थानी दाखल

थोड्याच वेळात केके यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात होणार

थोड्याच वेळात केके यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात होणार आहे. केके यांचे पार्थिव ज्या गाडीत ठेवण्यात येणार आहे ती गाडी आली आहे. 

गायक अभिजित भट्टाचार्य यांनी दिली प्रतिक्रिया

'केके यांचा जिथे काॅन्सर्ट झाला तिथल्या जागेबद्दल जे बोलल्या जातंय हे चुकीचं आहे. तो हाॅल चांगला आहे. माझा 12 दिवस आधीच तिथे काॅन्सर्ट झाला होता. त्यामुळे केकेला तेथील गर्दीमुळे त्रास झाला असं नाही आहे केके यांची तब्येत पण चांगली होती. त्यांना कोणताच त्रास नव्हता. मात्र जर एवढी गर्दी होत असले काॅन्सर्टमध्ये पुढे ॲम्बुलन्स अशावेळी ठेवावी अशी मी मागणी करतो.' असं गायक अभिजित भट्टाचार्य  म्हणाले. 

अमित शाहांकडून 'सम्राट पृथ्वीराज'चं कौतुक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी  बुधवारी (1 एप्रिल)  अक्षय कुमारचा (Akshay Kumar)  'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा चित्रपट पाहिला. यावेळी अमित शाह यांचे कुटुंब देखील उपस्थित होते. अमित शाह यांनी चित्रपट पहिल्यानंतर या सिनेमाचं कौतुक केलं. तसेच चित्रपट पाहिल्यानंतर अमित शाह हे चाणक्य सिनेमा हॉलच्या बाहेर जात असताना पत्नी सोनल शाह यांना  'चलिए हुकुम' असं म्हणाले. 


सविस्तर बातमी वाचा 

केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कलाकारांची हजेरी

गायक केके यांच्या अंतिम दर्शनासाठी कलाकार आतापासूनच यायला लागले आहेत. पार्श्वगायक हरिहरन देखील केके यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी हरिहरन भावूक झाले.



Salman Khan : सलमान खाननं केके यांना वाहिली श्रद्धांजली

सलमान खान :


 





दुपारी एक वाजता वर्सोवा येथील स्मशानभूमीत केके यांच्यावर होणार अंत्यसंस्कार

केके यांचे पार्थिव आज सकाळी 12.30 वाजेपर्यंत त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्याचवेळी दुपारी एक वाजता वर्सोवा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  



 

World Television Premiere : 'पावनखिंड' सिनेमाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

World Television Premiere : 'पावनखिंड' (Pawankhind) सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. 18 फेब्रुवारीला  'पावनखिंड' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता 19 जूनला 'पावनखिंड' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींना रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांमधील महापराक्रमी आणि शूरवीर असा हिरा म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. 


वाचा संपूर्ण बातमी

Happy Birthday Sonakshi Sinha: बॉलिवूड पदार्पणापूर्वी ‘हे’ काम करायची सोनाक्षी सिन्हा

Sonakshi Sinha Birthday : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आज (2 जून) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचा जन्म 2 जून 1987 रोजी बिहारमध्ये झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची ती मुलगी आहे. सोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने आपल्या करिअरची सुरुवात अभिनेता सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून केली होती.


सलमान-सोनाक्षीचा 'दबंग' हा चित्रपट 2010मध्ये रिलीज झाला होता. सोनाक्षी सिन्हाने तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली होती. पण, या चित्रपटापूर्वीच तिन्ही आपली ओळख ‘फॅशन डिझायनर’ म्हणून केली होती. तिने बराच काळ डिझायनर म्हणून काम केले होते. परंतु, जेव्हा सलमान खानने तिला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा सोनाक्षी सिन्हाचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. सलमानने पाहताच क्षणी तिला चित्रपटाची ऑफर दिली होती.


वाचा संपूर्ण बातमी

गायक केकेच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

गायक केके यांचे पार्थिव मुंबईतील पार्क प्लाझा वर्सोवा येथील संकुलाच्या सभागृहात अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात येणार आहे. येथे चाहते आणि कलाकार त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू शकतात. त्यानंतर वर्सोवा येथील हिंदू स्मशानभूमीत केके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केके यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. वयाच्या अवघ्या 53व्या वर्षी त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाला खूप मोठा धक्का बसला आहे.

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


मानहानीच्या प्रकरणात जॉनी डेपचा विजय!


Depp vs Amber Case: हॉलिवूडचा सुपरस्टार जॉनी डेप (Johnny Depp) आणि त्याची माजी पत्नी एम्बर हर्ड (Amber Heard) यांचा हाय-प्रोफाईल मानहानीचा खटला बराच काळ चर्चेत होता. जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यात मागील बऱ्याच काळापासून कायदेशीर लढाई सुरू होती, ज्यावर आता अखेर हा निकाल देण्यात आला आहे. दीर्घकाळ चाललेल्या या कायदेशीर लढाईत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सहा आठवडे चाललेल्या या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.


जॉनी डेप-एम्बर हर्ड मानहानीच्या खटल्यात, न्यायाधीशांनी जॉनी डेपच्या बाजूने निर्णय दिला. या खटल्यातील न्यायाधीशांनी एम्बर हर्डला या मानहानी खटल्यात दोषी ठरवले आणि निर्णय दिला की, जॉनी डेप यांनी आपली बदनामी झाल्याचे सिद्ध केले आहे. याव्यतिरिक्त, न्यायालयाने एम्बर हर्डला 10 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई आणि 5 दशलक्ष डॉलरचे दंडात्मक नुकसान भरण्याचे आदेश दिले.


सहा आठवडे चालला खटला!


जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यातील हाय-प्रोफाइल कायदेशीर लढाई दरम्यान गेल्या सहा आठवड्यांपासून अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले. गेल्या सहा आठवड्यात शंभरहून अधिक तास साक्षीदार साक्ष देत होते. साक्ष आणि वादविवाद अनेक तास सुरु होते. ज्युरीच्या सात सदस्यांनीही गेल्या तीन दिवसांत तासनतास चर्चा केली आणि त्यानंतर ज्युरी निर्णयावर पोहोचले.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.