Shakira, Gerard Piqué : जेरार्ड पिककडून प्रेमात धोका! पॉपस्टार शकीरा मोडणार 12 वर्षाचं नातं
Shakira, Gerard Piqué : फुटबॉलपटू जेरार्ड पिक (Gerard Piqué) आणि शकीरा (Shakira) यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
![Shakira, Gerard Piqué : जेरार्ड पिककडून प्रेमात धोका! पॉपस्टार शकीरा मोडणार 12 वर्षाचं नातं Shakira And Gerard Pique on Separation After She Caught Him With Another Woman Shakira, Gerard Piqué : जेरार्ड पिककडून प्रेमात धोका! पॉपस्टार शकीरा मोडणार 12 वर्षाचं नातं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/02/23777819b98eefd957c6c7ca523e62f1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shakira, Gerard Piqué : ‘वाका वाका गर्ल’ अर्थात पॉपस्टार शकीरा (Shakira) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. फुटबॉलपटू जेरार्ड पिक (Gerard Piqué) आणि शकीरा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शकीरा आणि जेरार्ड ही जोडी 2010पासून एकत्र आहे. या जोडीला दोन मुलंही आहेत. मात्र, आता जेरार्डने शकीराची फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे, त्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे. इतकचं नाही तर, दोघेही लवकरच वेगळे होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार गेल्या काही आठवड्यांपासून जेरार्ड त्याची जोडीदार शकीरापासून वेगळा राहत आहे. शकीराने काही आठवड्यांपूर्वी जेरार्डला एका महिलेसोबत पकडले होते. प्रेमात फसवणूक झाल्याचं कळताच शकीराने आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
जेरार्डने सोडले घर
काही मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जेरार्ड स्वतः शकीराच्या घरातून बाहेर पडला आहे. त्याने आपले सगळे समान बांधून आपला रस्ता वेगळा केला आहे. सध्या पार्टी आणि पबमध्ये तो एकटाच दिसतो. यामुळेच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्पाय दोघांनीही यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
अशी जुळली जोडी
2010च्या फिफा विश्वचषकाचे अधिकृत गाणे ‘वाका-वाका’ दरम्यान शकीरा आणि जेरार्ड यांची पहिली भेट झाली होती. शकीरानेच ‘वाका-वाका’ या गाण्याला आवाज दिला होता. तसेच, या गाण्यात फुटबॉलपटू जेरार्ड पिकही दिसला होता. शकीरा जेरार्डपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. शकीराचा जन्म 1977 मध्ये कोलंबियामध्ये झाला होता, तर जेरार्ड पिकचा जन्म 1987 मध्ये बार्सिलोना, स्पेनमध्ये झाला होता. शकीरा आणि जेरार्ड यांना दोन मुले आहेत. मात्र, या दोघांनी अद्याप विवाह केलेला नाही. शकीराने 2013 मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला. दोन वर्षांनंतर 2015 साली त्यांना दुसरा मुलगा झाला. फोर्ब्सच्या जगातील सर्वात ‘पॉवरफुल कपल’ यादीत शकीरा आणि जेरार्कचे नाव सामील होते.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)