Shivraj Singh Chouhan : अक्षय कुमारने घेतल्या मध्य प्रदेशातील 50 बालवाड्या दत्तक, बालकांच्या विकासासाठी 1 कोटी मदत; शिवराज सिंह चौहान यांनी मानले आभार
Shivraj Singh Chouhan : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे आभार मानले आहेत.
Shivraj Singh Chouhan : खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या बहुचर्चित 'पृथ्वीराज' (Prithviraj) सिनेमामुळे चर्चेत आला आहे. 'पृथ्वीराज' सिनेमा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान अक्षय कुमारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी अक्षय कुमारचे आभार मानले आहेत.
मध्यप्रदेशातील बालकांचा सर्वांगिण विकास होणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. अक्षय कुमारने या गोष्टीची दखल घेत बालवाडीतील मुलांना मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार खिलाडी कुमारने एक कोटी रुपये देण्याचा आणि 50 बालवाड्यांना दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे. यामुळेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अक्षय कुमारचे आभार मानले आहेत.
अभिनेता श्री @akshaykumar जी ने आंगनवाड़ी के इस अभियान के लिए एक करोड़ रुपया देने और 50 आंगनवाड़ियों को गोद लेने का संकल्प व्यक्त किया है।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) May 24, 2022
मैं उनके इस निर्णय के लिए मध्यप्रदेश की ओर से आभार व्यक्त करता हूं। #MamaKiAaganwadi https://t.co/V3KQDCzCnz pic.twitter.com/xEEBEocUfu
शिवराज सिंह चौहान यांनी केले होते मदतीचे आवाहन
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. नर्मदा पार्कपासून अशोका गार्डन, परिहार चौराहा, मन्वा देवी मंदिरपर्यंत शिवराज सिंह चौहान यांनी स्वत: बालवाडीतील मुलांसाठीच्या उपयोगी वस्तू नागरिकांकडून गोळा केल्या आहेत.
शिवराज सिंह चौहान यांच्या निर्णयामुळे बालवाडीतील विद्यार्थांचा सर्वांगिण विकास होण्यासोबतच ते सुशिक्षितदेखील होणार आहेत. मध्यप्रदेशच्या विकासासाठी महत्त्वाचा निर्णय आहे,अशा अनेक कमेंट्स नेटकरी करत आहेत.
अक्षय कुमार काही दिवसांपूर्वीच 'सेल्फी' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना भेटला होता. 'सेल्फी' सिनेमाचे शूटिंग भोपाळमध्ये झाले आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या आगामी पृथ्वीराज सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'पृथ्वीराज' या सिनेमाचं दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. अक्षय कुमारनं या सिनेमात 'पृथ्वीराज' ही प्रमुख भूमिका साकारली असून मानुषी छिल्लरने संयोगिता ही भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या