Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. गिरीशभाऊ तुम्ही यावेळी लढून घ्या, 2029 मध्ये तुम्हाला तिकीट देणार नाही. 2029 मध्ये साधना वहिनीच (गिरीश महाजन यांच्या पत्नी) निवडणूक लढणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांच्यापेक्षा साधना महाजन यांना जास्त मतं मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले. जामनेर येथे आयोजित शिवसृष्टी व भीमसृष्टी स्मारक अनावरण सोहळ्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मतं साधना महाजन घेऊ शकतात
या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांनी निवडणूक लढवावी. मात्र 2029 मध्ये गिरीश महाजन यांना तिकीट न देता गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना उमेदवारी देणार असल्याचे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांना पाडणार असल्याचे विरोधक म्हणतात. मात्र, ते शक्य नसून गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मतं केवळ साधना महाजन याच घेवू शकतात असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. जामनेरमध्ये आयोजित शिवसृष्टी व भिमसृष्टी स्मारकाच्या अनावरण प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचा पगार बंद होणार नाही
महिलांना एसटीमध्ये अर्ध तिकीट सवलत दिल्यापासून एसटी बस नफ्यात आली असल्याचे महाजन म्हणाले. कारण एसटीमध्ये महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळं एसटी बसेस या पूर्ण क्षमतेनं भरल्या आहेत. या योजनेमुळे महामंडळ नफ्यात आलं आहे. एवढ्या लोकप्रिय योजना देणारे सरकार हे राज्यात पहिल्यांदा आल्याचे महाजन म्हणाले. त्यांनी 50 50 वर्ष राज्य केलं ते आता भोंगे पसरवत आहेत तुम्ही तर काही केलं नाही मग आज तुम्ही का ओरडता? असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. आमची तिजोरी खाली झाली पगार कुठून देणार ते आम्ही पाहू. पगार देण्याचं काम आमचं आहे तुमचं नाही. आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचा पगार बंद होणार नाही असेही महाजन म्हणाले. यावेळी आम्ही 1500 रुपये देतोय पुढच्यावेळी आम्ही तीन हजार रुपये करु असंही ते म्हणाले. त्यामुळे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले व ठाकरे गट वाले छाती ठोकून ओरडताय रडताय की आता आमचं काय होईल. त्यांना आता माहिती आहे की कोणतीच बहीण आपल्याला मदत करणार नाही, कारण हेच काँग्रेस वाले महिलांच्या योजने विरोधात कोर्टात गेली आहे. त्यामुळं त्यांना आता रात्रीची झोप येत नाही असे महाजन म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: