एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 16 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 16 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Sushmita Sen First Reaction : ललित मोदींच्या पोस्टनंतर सुष्मिताची पहिली रिअॅक्शन; म्हणाली...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  सुष्मिता सेन (Sushmita Sen)आणि ललित मोदी (Lalit Modi) सध्या चर्चेत आहेत.  ललित मोदी यांनी शेअर केलेल्या डेटिंगच्या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या आहे. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली आहे. आता सुष्मितानं या पोस्टवर रिअॅक्शन दिली आहे.

Deepika Padukone : 'सेम टू सेम'; दीपिकासारख्या दिसणाऱ्या तरुणीची सोशल मीडियावर हवा!

बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या डुप्लिकेट्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आलिया भट्ट (Alia Bhatt), शाहरुख खान (Shah Rukh Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. आता या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या (Deepika Padukone) नावाचा समावेश झाला आहे. दीपिका सारख्या दिसणाऱ्या एका तरुणेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोंना पाहून नेटकरी देखील अवाक् झाले आहेत.

Koffee With Karan 7: रश्मिका मंदना आणि विजय देवरकोंडाच्या नात्याबाबत सारा अली खानचा गौप्यस्फोट; म्हणाली...

नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की, रश्मिका ही प्रसिद्ध अभिनेता  विजय देवरकोंडाला (Vijay Deverakonda) डेट करत आहे. रश्मिका आणि विजय यांनी अजून त्यांच्या नात्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. आता ‘कॉफी विद करण 7’ (Koffee With Karan 7) मध्ये अभिनेत्री सारा अली खाननं (Sara Ali Khan) रश्मिका आणि विजयच्या नात्याबाबत एक गौप्यस्फोट केला आहे.

‘आई कुठे काय करते’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकांच्या सेटवर भीतीचं वातावरण

छोट्या पडद्यावर सध्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकांचा बोलबाला आहे. या मालिकांच्या कथानाकांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. मात्र, सध्या या मालिकांच्या सेटवर भीतीचं वातवरण पसरलं आहे. या मालिकांच्या सेटवर भूताचा वावर असल्याची चर्चा सुरु आली आहे. या भूताने ‘आई कुठे काय करते’च्या ‘संजनाची आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील ‘शालिनी’ची झोप उडवली आहे.

Nayanthara, Vignesh Shivan : एका चुकीमुळे 25 कोटींचे नुकसान; नयनतारा- विग्नेशसोबतची डील नेटफ्लिक्सनं केली रद्द?

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून 2022  रोजी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली. नयनतारा आणि विग्नेश यांचा विवाह सोहळा चैन्नई येथे पार पडला. रजनीकांत, शाहरुख खान, मणिरत्नम, दिग्दर्शक बोनी कपूर, सूर्या, ए आर रहमान, एटली, कार्थी, वसंत रवी यांसारख्या सेलिब्रिटींनी  नयनतारा आणि विघ्नेश यांच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली. लग्न सोहळ्यातील नयनताराच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. नयनतारा आणि  विघ्नेश यांच्या लग्नसोहळ्याचा अल्बम नेटफ्लिक्सवर रिलीज होणार होता. नेटफ्लिक्ससोबत नयनतारा आणि विघ्नेश यांनी 25 कोटींची डील केली होती. पण रिपोर्टनुसार, नयनतारा आणि निघ्नेश यांच्यासोबतची ही डील रद्द करण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे.

14:07 PM (IST)  •  16 Jul 2022

गोल्डन गाऊनमध्ये नुसरत भरुचाने शेअर केला क्लासी लूक

नुसरतने तिच्या या लूकचे क्लोज अप फोटो शेअर केले आहेत. तिने न्यूड मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे.यावेळी अभिनेत्रीने आपले केस खुले ठेवले आहेत.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nushrratt Bharuccha (@nushrrattbharuccha)

14:03 PM (IST)  •  16 Jul 2022

लंडनच्या राणीच्या घरी जाधवांची होणार स्वारी! 'दे धक्का 2'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

‘दे धक्का 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘दे धक्का 2’च्या टीझरमुळे प्रेक्षकही उत्सुक झाले असून, त्यांच्या लाडक्या मकरंद जाधव, सुमती जाधव,  धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसनाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत.

 

14:00 PM (IST)  •  16 Jul 2022

ब्युटी इन ब्लॅक, रकुल प्रीतचा हा लूक होतोय व्हायरल!

बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा भाग असते. आता पुन्हा एकदा रकुल लेटेस्ट फोटोशूटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे, ज्यावरून लोकांची नजर हटवणे कठीण झाले आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

13:58 PM (IST)  •  16 Jul 2022

Sophie Turner : प्रियांका चोप्राच्या घरी आणखी एका चिमुकलीचे आगमन! ‘जाऊबाई’ सोफी टर्नर झाली आई

Sophie Turner : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिच्या घरी पुन्हा एकदा आनंदाची उधळण झाली आहे. अभिनेत्री प्रियांका दुसऱ्यांदा ‘काकी’ बनली आहे. प्रियांका चोप्राची ‘जाऊबाई’ सोफी टर्नर (Sophie Turner) पुन्हा आई झाली असून, तिने एका मुलीला जन्म दिला आहे. सोफी टर्नर आणि जो जोनास (Jo Jonas) यांच्या घरी गुरुवारी (14 जुलै)  चिमुकलीचे आगमन झाले आहे. सोफी टर्नरच्या प्रवक्त्याने मीडियाला यासंदर्भात माहिती दिली.

वाचा संपूर्ण बातमी

11:56 AM (IST)  •  16 Jul 2022

Katrina Kaif, Vicky Kaushal : कतरिना कैफ-विकी कौशल चाहत्यांना देणार ‘गुडन्यूज’?

Katrina Kaif, Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आज (16 जुलै) तिचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री, पती विकी कौशल (Vicky Kaushal) याच्यासोबत मालदीवला रवाना झाली आहे. मालदीवमध्ये विकी आणि कतरिना वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणार आहेत. दोघांचे मालदीवला रवाना होतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. विकी आणि कतरिना मालदीवला रवाना होत असताना पापाराझींनी त्यांना मुंबई विमानतळावर घेरले होते.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit pawar On Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीतून अजित पवार १० मिनिटांत निघून गेले #abpमाझाBopdev Ghat Case Update : सीसीटीव्हीमध्ये सापडू नये यासाठी आपोरींकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्नSambhaji raje Chhtrapati : संभाजीराजेंच्याा नेतृत्वात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष विधानसभा लढवणारPune Bopdev Ghaat : बोपदेव घाट प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Nana Patole : 'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
The Nobel Prize Nihon Hidankyo : हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
Embed widget