![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sophie Turner : प्रियांका चोप्राच्या घरी आणखी एका चिमुकलीचे आगमन! ‘जाऊबाई’ सोफी टर्नर झाली आई
Sophie Turner : प्रियांका चोप्राची ‘जाऊबाई’ सोफी टर्नर (Sophie Turner) पुन्हा आई झाली असून, तिने एका मुलीला जन्म दिला आहे.
![Sophie Turner : प्रियांका चोप्राच्या घरी आणखी एका चिमुकलीचे आगमन! ‘जाऊबाई’ सोफी टर्नर झाली आई Priyanka Chopra’s Sister in Law Sophie Turner and Jo Jonas welcomes baby girl Sophie Turner : प्रियांका चोप्राच्या घरी आणखी एका चिमुकलीचे आगमन! ‘जाऊबाई’ सोफी टर्नर झाली आई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/95a3718a5ce5b0fad115ec909fc61d201657959744_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sophie Turner : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिच्या घरी पुन्हा एकदा आनंदाची उधळण झाली आहे. अभिनेत्री प्रियांका दुसऱ्यांदा ‘काकी’ बनली आहे. प्रियांका चोप्राची ‘जाऊबाई’ सोफी टर्नर (Sophie Turner) पुन्हा आई झाली असून, तिने एका मुलीला जन्म दिला आहे. सोफी टर्नर आणि जो जोनास (Jo Jonas) यांच्या घरी गुरुवारी (14 जुलै) चिमुकलीचे आगमन झाले आहे. सोफी टर्नरच्या प्रवक्त्याने मीडियाला यासंदर्भात माहिती दिली.
‘जो जोनास आणि सोफी टर्नर त्यांच्या मुलीच्या आगमनाने खूप आनंदी आहेत’, म्हणत आनंदाची बातमी देणारे एक निवेदन त्यांच्या प्रवक्त्याने जारी केले आहे. या जोडप्याला आधीच 2 वर्षांची मुलगी आहे, जिचे नाव ‘विला’ आहे. सोफी टर्नर आणि जो जोनास यांनी 2016 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. यानंतर ऑक्टोबर 2017मध्ये त्यांची एंगेजमेंट झाली. सोफी टर्नर आणि जो जोनास यांनी 2019मध्ये लास वेगासमध्ये एका खाजगी सोहळ्यात लग्न केले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी दोघांनीही फ्रान्समध्ये पूर्ण विधिवत पुन्हा लग्न केले होते. त्यांच्या या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर 2020च्या जुलैमध्ये, हे जोडपे पहिल्यांदा पालक झाले.
'द गेम ऑफ थ्रोन्स' प्रसिद्ध सोफी टर्नर!
सोफी टर्नर ही हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोफी तिच्या 'द गेम ऑफ थ्रोन्स' या सीरिजसाठी प्रसिद्ध आहे. या 59 एपिसोडच्या शोमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. या सीरिजसाठी सोफीने तीनदा पुरस्कारही जिंकला आहे. सोफी 'टाइम फ्रीक', 'अनदर मी', 'जोशी', 'डार्क फिनिक्स' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे. 2016मध्ये तिला सर्वोत्कृष्ट जागतिक अभिनेत्रीचा किताबही मिळाला होता. तर, जो जोनास हा देखील एक गायक आणि अभिनेता आहे. जो जोनास आणि त्याचे भाऊ मिळून ‘जोनास ब्रदर्स’ नावाचा एक बँड देखील चालवतात.
यावर्षी जोनास कुटुंबात आनंदाचा वर्षाव झाला आहे. जोनास ब्रदर्सच्या घरात सोफीच नाही, तर प्रियांकाही आई बनली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला निक आणि प्रियांकाने सरोगसीद्वारे मुलीचे स्वागत केले होते.
हेही वाचा :
Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने पूर्ण केली 'सिटाडेल'ची शूटिंग; देसी गर्लने व्हिडीओ केला शेअर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)