एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 11 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 11 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

दोघींच्या संसाराची गोड गोष्ट सांगणारी 'नवा गडी नवं राज्य'; 8 ऑगस्टपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी मालिकाविश्वात सध्या नवनवीन विषयांवरील मालिकांचे प्रयोग होत आहेत. आता 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघींच्या संसाराची गोड गोष्ट सांगणारी 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका 8 ऑगस्टपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

शाहरुख खानच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा

आज जगभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. किंग खान आणि त्याचा धाकटा मुलगा अबरामने मन्नतच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देतानाचे शाहरुखचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

स्वप्नील जोशीच्या 'बळी'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

'पावनखिंड', 'झिम्मा', 'कारखानीसांची वारी', 'स्टेपनी' नंतर आता 'बळी' या सिनेमाचा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. रविवारी 17 जुलैला  दुपारी एक वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात स्वप्नील जोशी आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीने आषाढी एकादशीनिमित्त शेअर केला खास व्हिडीओ

आज महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दोन वर्षांनंतर आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त अनेक कलाकार चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परी अर्थात मायरा वैकुळनेदेखील आषाढी एकादशीनिमित्त एक खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

मंगेश देसाईच्या कारला अपघात; गाडीचे नुकसान

अभिनेता, निर्माता मंगेश देसाई गेल्या अनेक दिवसांपासून 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता मंगेश देसाई एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. कर्जतला जात असताना मंगेशच्या कारला अपघात झाला आहे.

17:21 PM (IST)  •  11 Jul 2022

Thor Love And Thunder : 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' प्रेक्षकांच्या पसंतीस; भारतात केली रेकॉर्डब्रेक कमाई

'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा 7 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी या सिनेमाने रिलीजच्या एक दिवस आधीच भारतात 18 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे विकेंडला हा सिनेमा चांगलाच धमाका करणार अशी शक्यता वर्तवली गेली होती. रिलीजच्या पहिल्या विकेंडला या सिनेमाने 64.80 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

17:04 PM (IST)  •  11 Jul 2022

Guru Purnima 2022 : मराठी मालिकांचा रंगणार गुरुपौर्णिमा विशेष भाग; 13 जुलैला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म .... भक्ताला परमेश्वराची ओळख गुरूमुळेचे होते. त्यामुळे परमेश्वर आणि गुरू यांपैकी आधी नमस्कार कुणाला करावा हा प्रश्नं नेहेमीच पडत असतो. गुरुच्या थोरवीचे काही शब्दांत वर्णन करता येणे अशक्यच ! गुरू-अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात. आता 13 जुलैला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. मराठी मालिकांचा (Marathi Serial) गुरुपौर्णिमा विशेष भाग रंगणार आहे.

16:30 PM (IST)  •  11 Jul 2022

Mika Di Vohti : 'स्वयंवर मिका दी वोटी'मध्ये मिकाच्या एक्स गर्लफ्रेंडची वाइल्ड कार्ड एन्ट्री; कार्यक्रमाच्या टीआरपीत वाढ

Akanksha Puri Entered In Mika Di Vohti : लोकप्रिय गायक मिका सिंहचा (Mika Singh) 'स्वयंवर मिका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमात 12 मुली सहभागी झाल्या होत्या. स्वयंवरात सहभागी झालेल्या मुली मिकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असताना आता या कार्यक्रमात मिकाची एक्स गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीची (Akanksha Puri) वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. 

16:09 PM (IST)  •  11 Jul 2022

Nava Gadi Nava Rajya : 'नवा गडी नवं राज्य' मालिकेतून अनिता दाते करणार पुनरागमन

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनिता दातेचा (Anita Date) हार घातलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या फोटो सोबत 'जो आवडतो सर्वांना' असं कॅप्शन देखील देण्यात आलं आहे, या फोटोमुळे तिचे चाहतेच नाही तर इतर सेलिब्रिटींना देखील प्रश्न पडलाय की, नेमका या फोटो मागचा अर्थ काय?. हा फोटो शेअर करण्यामागचं कारण आता प्रेक्षकांसमोर आलं आहे. नुकतंच एका नवीन मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीवर सादर करण्यात आला. 'नवा गडी नवं राज्य' (Nava Gadi Nava Rajya) असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेद्वारे अनिता दाते पुन्हा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

15:01 PM (IST)  •  11 Jul 2022

Timepass 3 : टाईमपास-3 मधील ‘लव्हेबल’ गाणं रिलीज; हृता आणि प्रथमेशचा रोमँटिक अंदाज

Timepass 3 : झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती, रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास 3' (Timepass 3) येत्या 29 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. दगडूचे वेड लावणारे प्रेम याआधी आपण सर्वांनीच पाहिले आहे. आता पुन्हा एकदा त्याच्या ‘लव्हेबल’ भावना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 'टाइमपास 3' मधील ‘लव्हेबल’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून हे गाणे प्रथमेश परब (prathamesh parab) आणि हृतावर (Hruta Durgule) चित्रित करण्यात आले आहे. 

पाहा गाणं 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit pawar On Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीतून अजित पवार १० मिनिटांत निघून गेले #abpमाझाBopdev Ghat Case Update : सीसीटीव्हीमध्ये सापडू नये यासाठी आपोरींकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्नSambhaji raje Chhtrapati : संभाजीराजेंच्याा नेतृत्वात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष विधानसभा लढवणारPune Bopdev Ghaat : बोपदेव घाट प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Nana Patole : 'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
The Nobel Prize Nihon Hidankyo : हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
Embed widget