Nava Gadi Nava Rajya : दोघींच्या संसाराची गोड गोष्ट सांगणारी 'नवा गडी नवं राज्य'; 8 ऑगस्टपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
Nava Gadi Nava Rajya : 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Nava Gadi Nava Rajya : मराठी मालिकाविश्वात सध्या नवनवीन विषयांवरील मालिकांचे प्रयोग होत आहेत. आता 'नवा गडी नवं राज्य' (Nava Gadi Nava Rajya) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघींच्या संसाराची गोड गोष्ट सांगणारी 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका 8 ऑगस्टपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
तगडी स्टारकास्ट असलेली 'नवा गडी नवं राज्य'
'नवा गडी नवं राज्य' या मालिकेचा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. प्रोमोवरून या मालिकेचा विषय थोडा वेगळा असेल याचा अंदाज येतो. या मालिकेत अनिता दाते (Anita Date),कश्यप परुळेकर (Kashyap Parulekar), (Pallavi Patil) पल्लवी पाटील, वर्षा दांदळे (Varsha Dandale) अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
घरावर राज्य असणाऱ्या एकीचा अर्धवट राहिलेला संसार पूर्ण करायला दुसऱ्या बायकोवर आलेलं राज्य म्हणून या मालिकेचं नाव ‘नवा गडी नवं राज्य’ असं ठेवण्यात आलं आहे असे म्हटले जात आहे. "जीव लावला की संसारातला प्रत्येक डाव जिंकता येतो.... त्या दोघींच्या संसाराची एक गोड गोष्ट...." असं म्हणत ‘नवा गडी नवं राज्य’चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
अनिता दाते अतरंगी भूमिकेत
‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत अनिता दाते अतरंगी भूमिकेत दिसून येणार आहे. प्रोमोमध्ये अनिता दातेच्या फोटोला हार लावलेला दिसत आहे. अनिताचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून प्रेक्षक आता मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहे. ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या