एक्स्प्लोर

Mararthi Movie: 'सोंग' चित्रपटाची घोषणा; मिलिंद शिंदे आणि वीणा जामकर प्रमूख भूमिकेत

विकासापासून वंचित असलेला समाज आणि शिक्षणाचं महत्त्व यावर सडेतोड भाष्य करणारा हा चित्रपट आहे. लेखक-दिग्दर्शक संजय कसबेकर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.

Mararthi Movie: अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत येणाऱ्या वैविध्यपूर्ण कथा-विषयांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मनोरंजनासोबतच समाजातील वास्तविकतेला अधिक वाव मिळताना दिसतोय. के.सी.एस प्रोडक्शन निर्मित असाच एक वेगळ्या धाटणीचा मराठी चित्रपट 'सोंग' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. क्षितिज सी. शिंदे निर्मित आणि संजय कसबेकर लिखित-दिग्दर्शित 'सोंग' चित्रपटाचा मुहूर्त नुकताच कलाकार, तंत्रज्ञ आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

भटक्या विमुक्त जमातीमधील एका सामान्य कुटुंबावर हा चित्रपट आधारलेला आहे. आज ही कित्येक दुर्गम भागात जिथे वीज नाही तिथे शिक्षणाचा काय पायपोस. विकासापासून वंचित असलेला समाज आणि शिक्षणाचं महत्त्व यावर सडेतोड भाष्य करणारा हा चित्रपट आहे. लेखक-दिग्दर्शक संजय कसबेकर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटात मिलिंद शिंदे, नागेश भोसले, विकास समुद्रे, वीणा जामकर, पूर्णिमा अहिरे यांसारख्या अनुभवी कलाकारांसह विनोद दोंदे व प्रतिभा शिंपी आदींच्या भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी संतोष बोराटे आणि संदीप साळुंखे यांनी सांभाळली आहे तर कार्यकारी निर्माते जितू शिंदे आहेत. 

याप्रसंगी अभिनेते मिलिंद शिंदे यांनी समाजातील व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी ‘अंगी मोठं धाडस असावं लागतं आणि ते निर्माते क्षितिज शिंदे आणि दिग्दर्शक संजय कसबेकर करीत आहेत, याचा मला आनंद असल्याचं मत व्यक्त केलं’. अत्यंत ज्वलंत असा हा विषय असून यावर चित्रपट येणं ही 'सोंग' चित्रपटाची उजवी बाजू असल्याचे ही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 'सोंग' चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.

मिलिंद शिंदे यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती 

जयंती,रे राया,भिकारी, टूरिंग टॉकीज यांसारख्या चित्रपटांमध्ये मिलिंद यांनी काम केलं. त्यांच्या नटरंग या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तू तिथे मी, अग्निहोत्र, बालपण देगा देवा, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलं. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.  

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget