Entertainment News Live Updates 07 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Dadar: 'फिरुनी जुळल्या रेशीमगाठी' घटस्फोटापासून परावृत्त झालेल्यांचा मेळावा; ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंची हटके संकल्पना
Dadar: लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात, असं म्हटलं जातं. पण सध्या वैचारिक मतभेद, स्वभावातील फरक अशा अनेक कारणांमुळे या रेशीमगाठी सोडण्याचा निर्णय अनेक जोडपी घेत आहेत. घटस्फोटापर्यंत पोहोचून देखील तो न घेता पुन्हा नव्यानं संसाराला सुरुवात करणाऱ्या जोडप्यांसाठी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये (Ashok Mulye) यांनी एका हटके मेळाव्याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंच्या हटके संकल्पनेतून नुकताच 'फिरुनी जुळल्या रेशीमगाठी' या नावाचा आगळावेगळा मेळावा पार पडला. दादरच्या (Dadar) सावरकर स्मारकातील तळमजल्यावरच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. घटस्फोटापर्यंत पोहोचून देखील तो न घेता पुन्हा एकदा आयुष्य एकमेकांच्या साथीने पुढे नेणाऱ्या आणि सध्या सुखी संसार करणाऱ्या दाम्पत्यांसाठी मेळाव्याचं आयोजन अशोक मुळ्ये यांनी केले.
Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेने गाठला 500 भागांचा टप्पा
Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माऊली' (Dnyaneshwar Mauli) या मालिकेने संतांची परंपरा उलगडत प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. माऊली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं. प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत.
Salman Khan : '68 व्या फिल्मफेअर फिल्म अवॉड्स'मध्ये सलमान खानकडे महत्त्वाची जबाबदारी
Salman Khan Host Filmfare Awards 2023 : 'फिल्मफेअर चित्रपट महोत्सव' (Filmfare Awards 2023) हा सिनेविश्वातील मानाचा पुरस्कार सोहळा आहे. सिनेसृष्टीत उत्कृष्ट काम करणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. लवकरच 68 वा चित्रपट महोत्सव पार पडणार असून या महोत्सवात सलमान खान (Salman Khan) सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.68 व्या फिल्मफेअर चित्रपट महोत्सवाकडे संपूर्ण सिनेविश्वाचं लक्ष लागलं आहे. येत्या 27 एप्रिलला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
Pushpa 2: गळ्यात लिंबाची माळ, भरजरी साडी अन् हातात बंदुक; पुष्पा-2 मधील अल्लू अर्जुनच्या लूकनं वेधलं लक्ष
Pushpa 2: सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पाः2 (Pushpa 2) चित्रपटाचा एक खास व्हिडीओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये पुष्पा तुरुंगातून फरार होऊन जंगलामध्ये गेलेला दिसला. आता नुकताच अल्लू अर्जुननं सोशल मीडियावर त्याचा पुष्पा-2 चित्रपटातील लूकचा फोटो शेअर केला आहे. फोटोमधील अल्लू अर्जुनच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
#Pushpa2TheRule Begins!!! pic.twitter.com/FH3ccxGHb8
— Allu Arjun (@alluarjun) April 7, 2023
Gumraah Movie Review : गुन्हेगारीवर भाष्य करणारा आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह'
Gumraah Movie Review : गेल्या काही दिवसांपासून ओरिजनल सिनेमापेक्षा रिमेक असलेल्या सिनेमांची निर्मिती करण्यावर प्रेक्षकांचा जोर आहे. या सिनेमांना प्रेक्षकदेखील पसंती दर्शवत आहेत. आता या यादीत आणखी एका सिनेमाची भर झाली आहे. आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि मृणाल ठाकूरचा (Mrunal Thakur) 'गुमराह' (Gumraah) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून हा सिनेमा 'थंडम' (Thandam) या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.
Gumraah Movie Review : गुन्हेगारीवर भाष्य करणारा आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह'
Rashmika Mandanna: विजय देवरकोंडासोबतच्या अफेअरच्या चर्चेवर अखेर रश्मिकानं सोडलं मौन; श्रीवल्ली म्हणाली, 'अय्यो...'
Rashmika Mandanna: नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी रश्मिकाचा वाढदिवस होता. या निमित्तानं तिच्या अनेक चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. रश्मिकानं एक व्हिडीओ शेअर करुन सर्व चाहत्यांचे आभार मानले. रश्मिकानं व्हिडीओ शेअर केल्यानंतर रश्मिका आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. आता या चर्चेवर नुकतीच रश्मिकानं प्रतिक्रिया दिली आहे.
Celina Jaitly: 'मी घर जावई व्हायला तयार आहे, माझ्याशी लग्न कर', म्हणत चाहत्यानं केलं प्रपोज; सेलिना जेटली म्हणाली, 'माझ्या तीन मुलांना...'
Celina Jaitly On Fans Marriage Proposal: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सेलिना जेटलीनं (Celina Jaitly) अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. जानशीन या चित्रपटामुळे सेलिनाला विशेष लोकप्रियता मिळाली. सेलिनानं पीटर हागसोबत लग्न केलं. पीटर आणि सेलिना यांना तीन मुलं आहेत. नुकतंच ट्विटरवर सेलिनाच्या चाहत्यानं तिला प्रपोज केली. चाहत्याच्या ट्वीटला सेलिनानं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले.
I will ask my husband and three kids and revert ! https://t.co/jIEXG8pEVD
— Celina Jaitly (@CelinaJaitly) April 6, 2023
Salman Khan : सलमान खानने खरेदी केली बुलेटप्रूफ कार!
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या धमकीप्रकरणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्याला धमकीचं पत्र मिळालं आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पण आता या धमक्यांना सलमान खान घाबरला असल्याचं समोर आलं आहे. भाईजानने आता बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे.
View this post on Instagram