Gumraah Movie Review : गुन्हेगारीवर भाष्य करणारा आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह'
Gumraah : आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूरचा 'गुमराह' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
वर्धन केतरत
आदित्य रॉय कपूर, मृणाल ठाकूर,
Gumraah Movie Review : गेल्या काही दिवसांपासून ओरिजनल सिनेमापेक्षा रिमेक असलेल्या सिनेमांची निर्मिती करण्यावर प्रेक्षकांचा जोर आहे. या सिनेमांना प्रेक्षकदेखील पसंती दर्शवत आहेत. आता या यादीत आणखी एका सिनेमाची भर झाली आहे. आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि मृणाल ठाकूरचा (Mrunal Thakur) 'गुमराह' (Gumraah) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून हा सिनेमा 'थंडम' (Thandam) या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.
'गुमराह' या सिनेमाचं कथानक काय? (Gumraah Movie Story)
'गुमराह' हा सिनेमा गुन्हेगारीवर आधारित आहे. रोनी आणि अर्जुन या दोन जुळ्या भावांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. रोनी हा एक गुन्हेगार आहे. तर अर्जुन एक यशस्वी उद्योगपती आहे. दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी कटुता आहे.
एका मर्डरने सिनेमात ट्वीस्ट येतं. पोलीस आदित्य रॉय कपूरला पकडतात. पोलीस अधिकारी असलेल्या रोनित रॉयला आधीपासूनच आदित्य रॉय कपूरवर राग असतो. त्यामुळे आदित्य अडचणीत यावा यासाठी रोनित रॉय वेगवेगळे प्रयत्न करतो. पण मर्डर नक्की रोनीने केला की अर्जुनने? की तिसराच कोणी व्यक्ती या सगळ्याचा सूत्रधार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहावा लागेल.
सिनेमातील अनपेक्षीत मर्डरने प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतात. सिनेमाचा पहिला भाग थोडासा रटाळ आहे. पण दुसऱ्या भागाने मात्र पहिल्या भागाची कमी भरून काढली आहे. दुसऱ्या भागाने चांगलाच जोर पकडलेला दिसून येतो. सिनेमातील रंजक वळणे खरचं पाहण्याजोगे आहेत. जर या सिनेमाच्या पहिल्या भागावर आणखी मेहनत घेतली असती तर सिनेमा आणखी मनोरंजनात्मक झाला असता. तर दुसरीकडे फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात आलेल्या दृष्यांवर विश्वास ठेवणं प्रेक्षकांना कठीण जात आहे.
आदित्य रॉय कपूरची दुहेरी भूमिका
'गुमराह' या सिनेमात आदित्य रॉय कपूर दुहेरी भूमिकेत दिसून आला आहे. या दोन्ही भूमिकांची सांगड घालण्यात अभिनेत्याला यश आलं आहे. दोन्ही भूमिकांचे वेगवेगळे शेड्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. तर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकलेल्या मृणाल ठाकूरचा एक वेगळा अवतार या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तिनेदेखील तिच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली असल्याचं सिनेमात दिसून येत आहे. रोनित रॉयच्या अभिनयाचंदेखील कौतुक.
'गुमराह' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा वर्धन केतरतने (Vardhan Ketkar) सांभाळली आहे. पण सिनेमाच्या पहिल्या भागावर वर्धनने जास्त मेहनत घेतली असती तर हा सिनेमा आणखी जास्त चांगला होऊ शकला असता. पण सिनेमाच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळाली आहे. एकंदरीत थरार नाट्य असणारा हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करेल.