एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates टीव्ही ते बॉलिवूड, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates टीव्ही  ते बॉलिवूड, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Yaariyan 2 Poster : सिक्वेलचा धडाका सुरुच! नव्या कलाकारांसह ‘यारियां’चा सिक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Yaariyan 2 Poster : 2014 साली गाजलेला यारियां या चित्रपटाचा सिक्वल लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात हिमांश कोहली, रकुल प्रित सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण सिक्वलमध्ये मात्र तेच कलाकार दिसणार नाहीत. सिक्वलमध्ये दिव्या खोसला कुमार, पर्ल व्ही पुरी आणि अभिनेता मिजान जाफरी यांच्या प्रमुख भूमिका असतील. जवळपास आता 8 वर्षानंतर चित्रपटाचा सिक्वल रिलीज होणार आहे. यारिया चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केले होते. पर्ल व्ही पुरी याआधी दिव्यासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. दिव्या आणि तिची बॉन्डिंग खूप खास आहे.

Subhedar Trailer : प्रदर्शनापूर्वीच 'सुभेदार' चित्रपटाने रचला नवा विक्रम, ट्रेलरला लाखोंची पसंती 

Subhedar Trailer : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांच्या  'सुभेदार' (Subhedar)  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने  वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरला अवघ्या काही तासातच हजारो व्ह्यूज मिळाले आहे. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून नेटकऱ्यांनी या ट्रेलरवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  18 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या ट्रेलरने नुकताच एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरचे व्ह्यूज सातत्याने वाढत असून प्रेक्षकांनी चित्रपटाच्या ट्रेलरला चांगलेच उचलून धरले आहे. काही तासांतच या ट्रेलरने कमाल केली आहे.

Priya Bapat: 'रंगभूमीवर पुनरागमन करण्याचा माझा निर्णय...'; प्रिया बापटनं शेअर केलेल्या व्हिडीओनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष

Priya Bapat:  मालिका, चित्रपट, वेब सीरिज आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. प्रियानं रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. प्रिया आणि उमेश कामत यांचे ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटाकच्या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच प्रियानं एक खास व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये ती नाटकाची रिहर्सल करताना दिसत आहे.

16:26 PM (IST)  •  10 Aug 2023

Khupte Tithe Gupte: 'मला एका रिक्षावाल्यानं शिवी दिली...'; 'खुप्ते तिथे गुप्ते' मध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी सांगितला किस्सा

Khupte Tithe Gupte:  अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte)  या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री  वंदना गुप्ते (Vandana Gupte) या हजेरी लावणार आहेत. हा एपिसोड प्रेक्षकांना 13 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना बघता येणार आहे. नुकताच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये वंदना गुप्ते या एक किस्सा सांगताना दिसत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

15:51 PM (IST)  •  10 Aug 2023

Subhedar Trailer: 'सुभेदार' चित्रपटाच्या ट्रेलरला दोन दिवसात दोन मिलियपेक्षा अधिक व्ह्यूज; चिन्मय मांडलेकरनं शेअर केली खास पोस्ट

Subhedar Trailer:  दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांचा  'सुभेदार' (Subhedar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुभेदार या चित्रपटाची टीम सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. दोन दिवसांपूर्वी सुभेदार या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. दोन दिवसात या ट्रेलरला दोन मिलियपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. याबाबत नुकतीच अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यानं एक खास पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar)

14:42 PM (IST)  •  10 Aug 2023

Rajinikanth Jailer Movie: रजनीकांत यांच्या 'जेलर'ची क्रेझ; चित्रपट पाहण्यासाठी जपानी जोडपं पोहोचलं चेन्नईला

Rajinikanth Jailer Movie: अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांचा  जेलर (Jailer) चित्रपट आज (10 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली आहे. सध्या जेलर हा चित्रपट पाहण्यासाठी चेन्नईमध्ये आलेल्या एका जपानी जोडप्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. हे जोडपं जपानमधील ओसाका या शहरामधून चेन्नईमध्ये जेलर हा चित्रपट पाहण्यासाठी आलेलं आहे.

15:51 PM (IST)  •  10 Aug 2023

Film On Seema Haider And Sachin: रुपेरी पडद्यावर उलगडणार सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी; ‘कराची टू नोएडा’ च्या ऑडिशनला सुरुवात, व्हिडीओ व्हायरल

Film On Seema Haider And Sachin: पाकिस्तानची   सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतामधील सचिन  (Sachin Meena) हे  जोडपे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या दोघांची लव्ह स्टोरी आता प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे.  ‘कराची टू नोएडा’  या चित्रपटात  सीमा हैदर आणि सचिन यांची लव्ह स्टोरी दाखवण्यात येणार आहे. ‘कराची टू नोएडा’ (Karachi to Noida Movie)   या चित्रपटाच्या ऑडिशनला सुरुवात झाली आहे.

11:48 AM (IST)  •  10 Aug 2023

Jailer: रजनीकांत यांचा 'जेलर' झाला रिलीज; प्रेक्षकांचा थिएटरबाहेर जल्लोष, पोस्टरला केला दुधाचा अभिषेक, व्हिडीओ व्हायरल

Jailer: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'जेलर' (Jailer) आज (10 ऑगस्ट) देशभरात रिलीज होत आहे. हा चित्रपट तमिळ भाषेतील असून तेलुगू आणि हिंदीमध्ये डब करण्यात आला आहे. रजनीकांत यांचा हा चित्रपट रिलीज होताच चाहत्यांनी थिएटरबाहेर गर्दी केली आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये रजनीकांत यांचे चाहते थिएटर बाहेर आणि जेलर चित्रपटाचा शो सुरु असताना जल्लोष करताना दिसत आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Embed widget