New OTT release: या आठवड्यात OTT वर थ्रीलर चित्रपटांसह सिरिजचा थरार, नेटफ्लिक्स, प्राईम, Zee5 वर मनोरंजनाचा पॉवरपॅक
New OTT release: ऑगस्टच्या शेवटच्या वीकेंड वर लक्ष ठेवणाऱ्यांना ओटीटीवरील या सिरीज आणि ॲक्शन चित्रपटांची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. इथेच या सिनेमा आणि वेबसिरिजचे ट्रेलर तुम्हाला पाहता येतील.
![New OTT release: या आठवड्यात OTT वर थ्रीलर चित्रपटांसह सिरिजचा थरार, नेटफ्लिक्स, प्राईम, Zee5 वर मनोरंजनाचा पॉवरपॅक Entertainment New OTT release powerpack of entertainment on Netflix Prime Zee5 jio cinema thriller movies and series new release New OTT release: या आठवड्यात OTT वर थ्रीलर चित्रपटांसह सिरिजचा थरार, नेटफ्लिक्स, प्राईम, Zee5 वर मनोरंजनाचा पॉवरपॅक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/27/5aec3b00d12ee168da6993efc86f0af217247470562471063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
New OTT release: मागील काही दिवसात अनेक चित्रपटांसह वेबसिरिज OTT वर प्रदर्शित झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा थ्रिलर चित्रपटांसह वेब सिरीज पाहण्यासाठी पॉवरपॅक ठरणार आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईमसह जिओ सिनेमा अशा सर्वच ठिकाणी अनेक नव्या वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत. काही थ्रिलर चित्रपटांसह वेब सिरीज रिलीज सध्या ट्रेंडिंग असून ॲक्शन चित्रपट ही सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या वीकेंड वर लक्ष ठेवणाऱ्यांना ओटीटीवरील या सिरीज आणि ॲक्शन चित्रपटांची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. इथेच या सिनेमा आणि वेबसिरिजचे ट्रेलर तुम्हाला पाहता येतील.
IC 814 कंदहार हायजॅक
भारतातील डिसेंबर 1999 मधील अपहरणाच्या भयंकर सत्य घटनांना दाखवणारी अनुभव सिन्हा यांची IC 814 कंदहार हायजॅक ही सिरीज 29 ऑगस्टला रिलीज होणार आहे. इंडियन एअरलाइनचे फ्लाईट 814 दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले आणि कंधार अफगाणिस्तानात वळवल्यानंतर नक्की काय झालं? अशी उत्सुकता ताणून धरणारा शो नेटफ्लिक्स वर रिलीज होणार आहे. यामध्ये नसरुद्दीन शहा दिया मिर्झा आणि पंकज कपूर यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर या एअरलाइनचे पायलट कॅप्टन शरण देव यांची भूमिका विजय वर्मा यांनी साकारली आहे.
Interogation
इंटररोगेशन हा एका निवृत्त न्यायाधीशाच्या गुढ मृत्यूवर आधारित एक मर्डर मिस्ट्री थ्रिलर आहे. या गूढ हा मृत्यूमागे असणारी गुपिते आणि खोटेपणा फसवणुकीचे जाळे हळूहळू उलगडत जातात. प्रत्येक संशयताच्या कथेत नवीन ट्विस्ट घेऊन तपास कसा कठीण होत जातो अशा प्रकारचा हा थ्रिलर तुम्हाला zee 5 वर 30 ऑगस्ट पासून पाहता येणार आहे. यात राजपाल यादव सह मनुसिंगने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
मुर्शिद
केके मेनन्ने या गँगस्टर थ्रिलर मध्ये पठाण या माझी माफिया डॉन ची भूमी भूमिका केली असून मुंबईच्या अंडरवर्ल्डवर आधारित हा थ्रिलर शो zee 5 वर पाहता येणार आहे. 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा हा शो राजकीय षडयंत्र, विश्वासघात आणि धोकादायक योजनेतून मुर्शिदला कसं बाहेर काढलं, अशा अनेक ट्विस्टने भरलेला आहे.
Buddy
हवाई वाहतूक नियंत्रण अधिकारी पल्लवी हिच्या दुःखद अपघातावर हा चित्रपट आहे. हाँगकाँग मध्ये गायत्रीच्या शरीराच्या अवयवांमधून विक्री करत नफा मिळवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांच्या टीमने तिला कोमात टाकले. त्यानंतर घडणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट नेटफ्लिक्स वरती ऑगस्ट ला रिलीज होणार आहे.
Godzilla X Kong the new Empire
Godzilla vs Kong नंतर मॉन्स्टर वर्स एका नवीन सीजनसह परत येतोय. Godzilla X Kong the new Empire असे या शोच नाव असून 29 ऑगस्ट ला जिओ सिनेमावर हा सिनेमा येणार आहे. नव्या राक्षसांसह भयानक थ्रिलर असणारा हा चित्रपट तरुणांमध्ये लोकप्रिय होणार यात शंका नाही.
द लॉर्ड ऑफ रिंग्स: द रिंग्स ऑफ पॉवर सीजन दुसरा
ही सिरीज सौरोनचे पुनरागमन आहे. गॅलरीयल उदयन्मुख डार्क लॉर्डला फेलोशिप मधून बाहेर टाकल्यानंतर त्याला स्वतःची शक्ती शोधण्यास रिंग ऑफ पॉवर ने जबाबदारी घेण्यास भाग पाडलं होतं. या सीजन मध्ये तुम्हाला पहिल्या सीजनची झलक ही पाहायला मिळेल. रिझल्ट आणि हेअर फूट मानव, ऑक्स आणि एल्व याच्यासह दमदार कथेसोबत हा सिनेमा ॲमेझॉन प्राईमवर 29 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
हेही वाचा:
'कल्कि 2898 एडी' नेटफ्लिक्सवर टॉप ट्रेंडवर; याव्यतिरिक्त 'हे' चित्रपटही ट्रेंडिंग लिस्टमध्ये सहभागी!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)