Mika Singh on Salman Khan: 'तू फिकर न कर उसकी...'लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सलमान खानच्या धमक्यांवर मिका सिंग थेटच म्हणाला....
मिका आणि सलमान यांची जिगरी दोस्ती सगळ्यांनाच माहित आहे. दरम्यान, मिका सिंगचा लाईव्ह कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच फिरतोय.
Mika Singh on Salman kHan: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या माध्यमांच्या केंद्रस्थानी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आधी बिगबॉसचा होस्ट म्हणून चर्चेत असणारा भाईजान बिश्नोई गँगच्या धमकी प्रकरणानं वादग्रस्त ठरला आहे. सलमान खानचे मित्र बाबा सिद्दकी यांच्या हत्येनंतर खुलेआम आलेल्या धमक्यांमुळे सलमान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ असल्याचं त्याच्या भावानं अरबाजनं माध्यमांना सांगितल्यानंतर सलमानच्या सुरक्षेवर अनेक कलाकरांनी बोट ठेवलं. आता नुकतेच प्रसिद्ध गायक मिका सिंग यांनं त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सलमानला धमकी देणाऱ्यांविषयी भाष्य केलंय. त्याच्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत सलमान खानसाठी एक ओळ गावीशी वाटते असं सांगत त्यानं तू फिक्र न कर उसकी असं म्हणत धीर धरायला सांगितलंय ते ही प्रसिद्ध शूटआउट ॲट लोखंडवाला सिनेमातल्या त्याच्या ए गणपत गाण्यातून..
मिका आणि सलमान यांची जिगरी दोस्ती सगळ्यांनाच माहित आहे. दरम्यान, मिका सिंगचा लाईव्ह कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच फिरतोय. त्यात त्यानं सलमान भाईसाठी ही ओळ असल्याचं सांगत त्यांनं सलमानला धीर दिला..
काय म्हणाला मिका सिंग?
भाई तेरे साथ मैं हूं... तू फिकर न कर. उसकी मां की.. बहन की... जो भी देखे इधर... अपून को बता दे तू कभी हो गयी फंटर, सबकी फटती अपने नाम से अपून जाये जिधर..थोडा कोक शोक हो तो अपून के दोस्त को दे ना यार...असं म्हणत ए गणपत... गाण्याच्या ओळी मिकानं म्हणल्या. यावर त्याच्या चाहत्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केल्याचंही दिसलं. यावेळी स्टेजवर अनुप जलोटा यांनीही या वादावर मौन सोडल्याचं दिसलं.
View this post on Instagram
अनुप जलोटा काय म्हणाले?
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृतानुसार अनुप जलोटा म्हणाले की, सलमान खानने लॉरेन्स बिश्नोई यांची माफी मागावी. जेणेकरुन त्यांच्या जीवनावर पडणारी धोक्याची छाया दूर करता येईल. अनूप जलोटा म्हणाले, 'सलमान खानने माफी मागावी. कोणतीही भीती न बाळगता जीवन जगणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. सलमान खानने या प्रकरणाला महत्त्व देऊ नये. तुम्ही माफी मागताच हे प्रकरण निकाली काढले जाईल. भांडण-भांडण करून कोणाला काही मिळणार नाही. माफी न मागितल्याने हे प्रकरण गंभीर बनत चालले आहे. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.