Divya Agarwal : हनीमूनवरुन परत येतात दिव्या अग्रवालने काढून टाकले लग्नाचे फोटो, तीन महिन्यांतच मराठमोळ्या नवऱ्यापासून होणार विभक्त?
Divya Agarwal : अभिनेत्री दिव्या अग्रवाल हिने तीन महिन्यांपूर्वी अपूर्व पाडगांवकरसोबत लग्नगाठ बांधली होती. पण सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Divya Agarwal : दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) हिने 20 फेब्रुवारी 2024 महाराष्ट्रीयन पद्धतीने अपूर्व पाडगांवरसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाची देखील सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु होती. पण लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांतच या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण दिव्या आणि अपूर्व हे नुकतेच हनीमूनवरुन परतले आहेत. पण इतक्यातच दिव्याने तिच्या लग्नाचे फोटो तिच्या सोशल मीडियावर काढून टाकलेत.
दिव्या आणि अपूर्वने त्यांच्या घरीत अत्यंत साधेपणाने लग्न केलं होतं. त्यानंतर दिव्याने गुढीपाडव्याचेही फोटो शेअर केले होते. दिव्याने तिच्या सोशल मीडियावरुन ते देखील फोटो काढून टाकले असल्याचं म्हटलं जातंय. अनेक कार्यक्रमांमुळे दिव्या ही सतत चर्चेत असते. त्यातच आता लग्नाच्या काही महिन्यांनंतर घटस्फोटच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
अपूर्वनेही काढून टाकले लग्नाचे फोटो
दिव्यासह अपूर्वने देखील त्याच्या लग्नाचे फोटो काढून टाकले असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. पण त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर दिव्यासोबतचे काही फोटो ठेवले आहेत. तीन दिवसांपूर्वीच दिव्या आणि अपूर्व एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. त्यामुळे खरंच यांच्यात काही बिनसलं आहे की या केवळ अफवा आहेत,याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
View this post on Instagram
वरुण सूदसोबत ब्रेकअप
दरम्यान अपूर्वआधी दिव्या ही वरुण सूदसोबत नात्यामध्ये होती. दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ब्रेकअप झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. तसेच ब्रेकअपनंतर त्यांच्यातील मैत्री कायम राहणार असल्याचंदेखील दिव्या म्हणाली होती.
View this post on Instagram