एक्स्प्लोर

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर दिग्दर्शक सुजय डहाकेच्या 'श्यामची आई' चित्रपटाची घोषणा

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर दिग्दर्शक सुजय डहाकेनं आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. साने गुरुजींची मूळ कादंबरीवर 'श्यामची आई'वर हा चित्रपट आधारित असेल.

मुंबई : 'शाळा', 'फुंतरू', 'आजोबा', 'केसरी' असे एका पेक्षा एक प्रवाहापेक्षा वेगळे चित्रपट बनवणारा तरुण दिग्दर्शक सुजय डहाके पुन्हा एकदा एका नव्या आव्हानासह रसिकांच्या भेटीला आला आहे. नेहमीच स्वत:समोर वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट बनवण्याची आव्हानं उभी करत ती यशस्वीपणे पार करणारा सुजय आता इतिहासाची पानं उलगडण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत सुजयनं 15 ऑगस्ट रोजी पोस्टर रिलीजच्या माध्यमातून आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या घोषणेसोबतच सुजयनं महाराष्ट्रातील तमाम रसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुजयनं 'श्यामची आई' या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. 

अमृता अरूण राव यांची निर्मिती असलेला 'श्यामची आई' हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच, साने गुरुजींच्या मूळ कादंबरीवर आधारित असेल. यंदाचं वर्ष भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या 150व्या जयंतीचं आहे. याच पुण्यपर्वाचं औचित्य साधत 'श्यामची आई' हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरु करण्याचा निर्णय सुजयनं घेतला आहे. या चित्रपटाची बरीच वैशिष्ट्यं असतील. यातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट असेल. या चित्रपटात ब्रिटिश राजवटीतील 1912 ते 1947 पर्यंतचा काळ पहायला मिळणार आहे. या चित्रपटाबाबतची कोणतीही माहिती सध्या तरी रिव्हील करण्यात आलेली नाही. तूर्तास केवळ 'श्यामची आई' या चित्रपटाची घोषणा करण्यात आल्याचं सुजयनं जाहीर केलं आहे. 

'श्यामची आई' हा चित्रपट पुढल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे. अद्याप या चित्रपटातील कलाकारांची निवड करण्यात आलेली नसून, ऑडीशनच्या माध्यमातून सर्व कलाकारांची निवड केली जाणार आहे. या चित्रपटाचा जुन्या 'श्यामची आई' या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. हा चित्रपट साने गुरुजींच्या कादंबरीवर आधारीत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कादंबरीतील बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्या आचार्य अत्रेंच्या 'श्यामची आई' चित्रपटात करण्यात आल्या नव्हत्या. 'शाळा' या पहिल्या चित्रपटापासून सुजयच्या मनात 'श्यामची आई' हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट बनवण्याचा विचार घोळत होता. इतर चित्रपटांसाठी काम करताना दुसरीकडे सुजयचा या चित्रपटावर रिसर्चही सुरु होता. यासाठी आपण पाच-सहा वर्षे मेहनत घेतली असून, 'श्यामची आई' बनवण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असल्याचं सुजयचं म्हणणं आहे. या चित्रपटाचं शूटिंग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करून प्रेक्षकांचा नॅास्टेल्जिया जागृत करत त्यांना 19 व्या शतकात नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget