एक्स्प्लोर

कियारा नाही तर ‘सैय्यारा’ फेम अभिनेत्री साकारणार मधुबाला? बायोपिकच्या चर्चांना उधाण

रुपेरी पडद्यावर आपल्या अद्वितीय सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या माधुबालांची भूमिका कोण साकारणार, याबाबत अनेक नावं चर्चेत होती.

Madhubala Biopic: बॉलीवूड अभिनेत्री मधुबाला यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून जोरात सुरू आहे. रुपेरी पडद्यावर आपल्या अद्वितीय सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या माधुबालांची भूमिका कोण साकारणार, याबाबत अनेक नावं चर्चेत होती. आता या चर्चांना नवं वळण मिळालं असून या चित्रपटासाठी सैय्यारा फेम अभिनेत्री अनीत पड्डा हिची निवड झाल्याची चर्चा इंडस्ट्रीमध्ये रंगली आहे. याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य अद्याप समोर आले नाहीय.

विशेष म्हणजे यापूर्वी या भूमिकेसाठीमाधुरी दीक्षितपासून करिना कपूर, कंगना रणौत आणि अलीकडे कियारा अडवाणी यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र आता निर्मात्यांनी नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. अलीकडेच सैय्यारा या प्रोजेक्टमुळे चर्चेत आलेल्या अनीत पड्डासाठी ही भूमिका तिच्या करिअरमधील मोठा टप्पा ठरू शकतो.

मधुबालाच्या बयोपिककडे चाहत्यांचे लक्ष 

मिळालेल्या माहितीनुसार, माधुबालांच्या आयुष्यावर आधारित या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी अनीत पड्डाला मुख्य भूमिकेसाठी साइन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या माधुबालांचा प्रवास पडद्यावर साकारण्याचं मोठं आव्हान अनीतसमोर असणार आहे. या चित्रपटात माधुबालांचं करिअर, त्यांचा संघर्ष, वैयक्तिक आयुष्य आणि रुपेरी पडद्यावरचा त्यांचा जादुई प्रवास दाखवला जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, या चित्रपटाबाबत निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनची तयारी सुरू झाली आहे. लवकरच या चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून दिग्दर्शक आणि इतर कलाकारांविषयीची माहितीही पुढील काही आठवड्यांत समोर येऊ शकते. जर ही बातमी अधिकृत ठरली, तर रुपेरी पडद्यावरील कालातीत सौंदर्यवती माधुबालांची भूमिका साकारणं हे अनीत पड्डासाठी मोठं आव्हान आणि तितकंच मोठं यश ठरू शकतं. यापूर्वी या भूमिकेसाठीकियारा अडवाणी हिचं नाव जोरात चर्चेत होतं. मात्र कियारा लवकरच मीनाकुमारी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये झळकणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्यानं, या प्रोजेक्टसाठी तिचं नाव आता मागे पडल्याचं बोललं जात आहे.

कियारा नाही तर ‘सैय्यारा’ फेम अभिनेत्री साकारणार मधुबाला? बायोपिकच्या चर्चांना उधाण

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सौंदर्य, निरागसता आणि मोहक अभिनय यांचा उल्लेख झाला की सर्वात आधी आठवतं ते नाव म्हणजे मधुबाला. आपल्या गोड स्मितहास्याने, अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्सने आणि नैसर्गिक अभिनयाने तिने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही तिच्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या कथा चाहत्यांमध्ये तितक्याच उत्कटतेने सांगितल्या जातात. त्यामुळेच तिच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची चर्चा सुरू होताच सिनेरसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget