सनी देओल आणि पूजा भट्ट 24 वर्षांनंतर एकत्र येणार; आर बाल्की यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा
प्रसिध्द दिग्दर्शक आर बाल्की यांच्या 2022 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात सनी देओल, पूजा भट, श्रेया धन्वंतरी, दुलकर सलमान हे सुप्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत.

मुंबई : प्रसिध्द दिग्दर्शक आर बल्की यांनी सोशल मिडीयावर आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रख्यात अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री पूजा भट्ट असणार आहे. 24 वर्षानंतर या दोघांची जोडी प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे. आर बल्की यांनी बॅालिवूड अनेक प्रसिध्द चित्रपट दिले. 'पा', 'इंग्लिश विंग्लिश' ,'शमिताभ', 'पॅडमॅन' , 'मिशन मंगल' असे एकाहून एक सुपहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले.
'आर बल्की' यांच्या दिग्ददर्शनातून तयार होणारा हा चित्रपट 2022 च्या सुरवातीला रीलीज होणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट थ्रिलर अर्थातच थरारक असून त्याचे नाव अद्याप ठरलं नाही. सनी देओल व पूजा भट या कलाकारांसोबतच या सिनेमात 'श्रेया धन्वंतरी' आणि 'दुलकर सलमान' हे प्रसिध्द कलाकार दिसून येणार आहे.
आर बाल्की हे पहिल्यांदा अशा प्रकारचा थ्रिलर म्हणजेच थरारक असा चित्रपट दिग्दर्शित करणार असून या चित्रपटासाठी ते खूप जास्त उत्साहित आहेत. सिनेमाचे नाव अजूनही ठरलेले नाही आहे.पण लवकरच हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एकेकाळी गाजलेल्यांपैकी सनी देओल व पूजा भट या कलाकारांसोबत आपण काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं आर बाल्की यांनी सांगितलं. शिवाय हा सिनेमा प्रेक्षकांना सुध्दा तितकाच आवडेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सनी देओलचा गदर 2 येणार
सनी देओलने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. घायल, घातक, दामिनी, जिद्दी असे अनेक. या सगळ्यात कडी केली होती ती गदर सिनेमाने. 2001 मध्ये आलेल्या गदरने धमाका केला. आमिषा पटेल आणि सनी देओल यांच्या गदर सिनेमातली गाणी तर गाजलीच शिवाय, सनीने रंगवलेला तारासिंग लोकांना आवडला. आता तब्बल 20 वर्षांनी गदरमधला हा तारासिंग पुन्हा एकदा पाकिस्तानात जाणार आहे. आणि तीच असणार आहे गदर 2 ची गोष्ट. येत्या दोन वर्षात त्याचा हा चित्रपट येणार आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
