Chehre Release Date: अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित 'चेहरे' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
चेहरे हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

मुंबई : अक्षय कुमारच्या बेलबॉटम चित्रपटाच्या घोषणेनंतर आता अनेक चित्रपटांच्या रिलीझच्या तारखा जाहीर करण्यात येत आहे. अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांचा ‘चेहरे’ हा चित्रपटाच्या रिलीझची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये 27 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे निर्माते आनंत पंडित यांनी ही घोषणा केली आहे.
चेहरे हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर हा चित्रपट 9 एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार परंतु दुसऱ्या लाट आल्यानंतर चित्रपटगृहे बंद करण्यात आली आणि पुन्हा प्रदर्शनाची तारीख लांबणीवर गेली.
View this post on Instagram
‘चेहरे’ चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केले आहे. या चित्रपटात कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. अमिताभ आणि इम्रानसोबतच रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर देखील दिसणार आहेत. तसेच क्रिस्टल डीसूजासोबत रिया चक्रवर्ती देखील चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये कायम चर्चेचा विषय बनून राहिला होता. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एक वरिष्ठ क्रिमिनल वकिलांची भूमिका केली आहे.
आनंद पंडित म्हणाले की, या चित्रपटासाठी टीमने मोठी मेहनत घेतली. आम्हाला कायम चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याची इच्छा आहे. रूमी जाफरीने चित्रपट चित्रपटागृहात प्रदर्शित होणार असल्याने आनंद व्यक्त केला आहे. चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरन्मेंट प्रायवेट लिमिटेडने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
