Dhurandhar Box Office Collection Day 6: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'चं चक्रीवादळ; सहाव्या दिवशी फिल्मची अंदाधुंद कमाई, डबल सेंच्युरीपासून फक्त एक पाऊल दूर
Dhurandhar Box Office Collection Day 6: विकेंड असो वा विक डेज 'धुरंधर' दुहेरी अंकात कमाई करतोय. गेल्या सहा दिवसांत रणवीर सिंहच्या 'धुरंधर'नं भारतात किती कमाई केली?

Dhurandhar Box Office Collection Day 6: रणवीर सिंहचा (Ranveer Singh) 'धुरंधर' सिनेमा (Dhurandhar Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालतोय. अक्षय खन्नानं (Akshaye Khanna) खुंखार विलन साकारलेला हा स्पाय-थ्रिलर सिनेमा (Spy Thriller Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) धमाकेदार कमाई करतोय. फक्त तीनच दिवसांत 'धुरंधर' सिनेमानं (Dhurandhar) 100 कोटींच्या क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री घेतली असून आता हा सिनेमा त्याच वेगानं 200 कोटींकडे वाटचाल करतोय. विकेंड असो वा विक डेज हा सिनेमा दुहेरी अंकात कमाई करतोय. गेल्या सहा दिवसांत रणवीर सिंहच्या 'धुरंधर'नं भारतात किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...
ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कनं दिलेल्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी 28 कोटी रुपयांच्या दमदार ओपनिंगनंतर, शनिवारी 'धुरंधर'नं 32 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे रविवारचं कलेक्शन 43 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. पण, सोमवारी कमाईत काहीशी घट पाहायला मिळाली. सोमवारी सिनेमानं 23.25 कोटींची कमाई केली. दरम्यान, मंगळवारी 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिसवर पुन्हा मुसंडी मारत 27 कोटींची कमाई केली. आता, सिनेमाच्या सहाव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
सॅकनिल्कच्या मते, बुधवारी 'धुरंधर'नं 26.50 कोटी रुपयांची कमाई केली. हा एक सुरुवातीचा अंदाज आहे आणि अधिकृत डेटा जाहीर झाल्यानंतर त्यात थोडा फरक पडू शकतो. यामुळे रणवीर सिंहच्या चित्रपटाची भारतात सहा दिवसांची एकूण कमाई 180 कोटींवर पोहोचली आहे. जर सिनेमानं अशीच दमदार कमाई सुरू ठेवली तर, गुरुवारी हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा नक्की गाठेल.
'धुरंधर'ची भारतातील कमाई (कोट्यवधींमध्ये)
| दिवस | 'धुरंधर'ची कमाई |
| पहिला दिवस | 28 कोटी |
| दुसरा दिवस | 32 कोटी |
| तिसरा दिवस | 43 कोटी |
| चौथा दिवस | 23.25 कोटी |
| पाचवा दिवस | 27 कोटी |
| सहावा दिवस | 26.50 (अर्ली एस्टीमेट) कोटी |
| एकूण | 180.00 कोटी |
'धुरंधर'ची कथा पाकिस्तानातील लियारी मधली
रणवीर सिंहचा 'धुरंधर' हा एक अॅक्शन-पॅक्ड स्पाय थ्रिलर आहे. आदित्य धर यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट वास्तविक घटनांपासून प्रेरित आहे, विशेषतः पाकिस्तानातील लियारीमधील अंडरवर्ल्ड आणि भारताच्या गुप्तचर संस्थेच्या मोहिमेभोवती घडणाऱ्या घटनांपासून. 'धुरंधर'मध्ये रणवीर सिंह एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारतो, जो लियारीमधील एका गँगस्टरच्या टोळीत घुसखोरी करतो. अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























