Akshaye Khanna Copy Vinod Khanna Dance In Dhurandhar: अक्षय खन्नाच्या 'धुरंधर'मधील सिग्नेचर डान्स स्टेपचं विनोद खन्ना-रेखाशी कनेक्शन, तो जुना व्हिडीओ व्हायरल
Akshaye Khanna Copy Vinod Khanna Dance In Dhurandhar: सध्या सोशल मीडियावर विनोद खन्नांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते 'धुरंधर' सिनेमात अक्षय खन्नानं जसा बलोची गाण्यावर ठेका धरला आहे, तसाच ठेवा धरुन नाचत आहेत.

Akshaye Khanna Copy Vinod Khanna Dance In Dhurandhar: 'धुरंधर' (Dhurandhar Movie) सिनेमातील 'FA9LA' सॉन्गमध्ये अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) एन्ट्रीनं सर्वांना घायाळ केलंय. सोशल मीडियावर अक्षय खन्नावर स्तुतिसुमनं उधळली जात आहेत. पण, सध्या 'FA9LA' सॉन्गमधली एन्ट्री आणि त्यात केलेला डान्स अक्षय खन्नान कॉपी केल्याचं बोललं जात आहे. हा दावा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओंमधून केला जात आहे. पण, अक्षय खन्नानं नेमकी कुणाची कॉपी केली? व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अक्षय खन्नानं त्याचे वडील सुपरस्टार विनोद खन्ना (Vinod Khanna) यांची कॉपी केल्याचं सांगितलं जातंय. सध्या सोशल मीडियावर विनोद खन्नांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते 'धुरंधर' सिनेमात अक्षय खन्नानं जसा बलोची गाण्यावर ठेका धरला आहे, तसाच ठेवा धरुन नाचत आहेत.
अक्षय खन्नानं वडिलांच्या स्टेप्स कॉपी केल्यात? (Did Akshaye Khanna Copy His Father Steps?)
'धुरंधर'मध्ये, जेव्हा अक्षय खन्नाला बलोची पगडी घालून फ्लिपार्चीच्या 'FA9LA' गाण्यावर नाचतो, तेव्हा त्याच्यावरची नजर हटवणं अवघड होऊन जातं. अक्षय खन्नानं ज्या पद्धतीनं सीन सादर केलाय, तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप्स आणि हावभावांनी सर्वांनाच मोहीत केलंय. पण आता एका नव्या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, अक्षय खन्नानं केलेल्या डान्स स्टेप्स त्याचे वडील विनोद खन्ना यांच्यासारख्याच होत्या.
View this post on Instagram
अगदी ठामपणे सांगणं अवघड आहे की, अक्षय खन्नानं वडील विनोद खन्नांच्या डान्स स्टेप्स कॉपी केल्यात. पण, 'धुरंधर'च्या प्रमोशनवेळी दिग्दर्शक आदित्य धर आणि इतर कलाकारांनी दिलेल्या मुलाखतींमध्ये फ्लिपार्चीच्या 'FA9LA' गाण्याच्या शुटिंगवेळी विनोद खन्नानं ज्या डान्स स्टेप्स केल्यात, त्या कुठेही ठरवण्यात आलेल्या नव्हत्या. शॉर्ट देताना अक्षय खन्नानं त्या स्टेप्स अचानक स्वतःहूनच केलेल्यात. अशातच चाहते अंदाज बांधत आहेत की, अक्षय खन्नानं कदाचित वडील विनोद खन्ना यांच्या स्टेप्स कॉपी करण्याचं ठरवलं असेल. कोरियोग्राफर विजय गांगुली यांनी सांगितलं की, अक्षय खन्नानं गाण्यात जो काही सेकंदांचा डान्स केलाय, तो कोरियोग्राफ केला नव्हता. अक्षय खन्नाला ज्यावेळी सीन समजावून सांगण्यात आला, त्यावेळी त्यानं स्वतःहून त्या स्टेप्स केलेल्या. तसेच, त्यानं स्वतःच विचारलं की, मी इथे थोडासा डान्स करू शकतो का? आणि अचानक अक्षय खन्नानं शॉर्ट देताना ठेका धरला.
अक्षय खन्नानं इंप्रोवाइज केलेला सीन (Did Akshaye Khanna's Improvised Scene)
मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना विनोद खन्ना म्हणालेला की, "या गाण्यात अक्षय खन्नाच्या कॅरेक्टरला शेर-ए-बलोच बनवण्याचा सोहळा दाखवण्यात आला आहे. खरंतर शॉर्ट असा होता की, त्याला डान्सर्सच्या मधून चालत जाऊन एन्ट्री घ्यायची होती आणि तिथे वर गादीवर जाऊन बसायचं होतं... पण, सीनमुळे तिथे झालेली वातावरण निर्मिती आणि डान्सर्सचा परफॉर्मन्स पाहून अक्षयनं विचारलं की, तो एन्ट्री घेतना थोडासा डान्स करू शकतो का? आमच्यापैकी कुणाला काहीच माहीत नव्हतं की, अक्षय खन्ना नेमकं काय करणार आहे. अक्षयनं आतमध्ये एन्ट्री घेतली आणि तिथूनच काही डान्स स्टेप्स केल्या..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























