Dadasaheb Phalke Death Anniversary : दादासाहेब फाळकेंच्या ‘हलत्या चित्रां’चं स्वप्न पुढे मनोरंजन विश्व बनलं! जाणून घ्या त्यांच्या प्रवासाबद्दल...
दादासाहेब फाळके यांनी 19 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 95 चित्रपट केले. त्यांनी पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' अवघ्या 15 हजारात बनवला होता.
Dadasaheb Phalke : दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांनी देशातील पहिला चित्रपट बनवला, म्हणून त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हटले जाते. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार दरवर्षी मनोरंजनाच्या जगात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या विशेष व्यक्तीला दिला जातो. साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना गेल्या 5 दशकांपासून हा पुरस्कार मिळत आहे.
दादासाहेब फाळके यांनी 19 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 95 चित्रपट केले. त्यांनी पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' अवघ्या 15 हजारात बनवला होता. परदेशात जाऊन पाहिलेल्या स्वप्नातून त्यांनी भारतात एक नवं विश्वच निर्माण केलं.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे खरे नाव 'धुंडीराज गोविंद फाळके' होते. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी झाला. ते उत्तम लेखक, तसेच उत्तम दिग्दर्शक होते. दादासाहेब फाळके यांना कलेची आवड होती. त्यांना याच क्षेत्रात करिअर करायचे होते. यासाठी त्यांनी 1885 मध्ये जेजे कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. कला महाविद्यालयानंतर त्यांनी पुढील शिक्षण कला भवन, वडोदरा येथे पूर्ण केले. 1890 मध्ये, दादासाहेब वडोदरा येथे गेले, जेथे त्यांनी काही काळ छायाचित्रकार म्हणून काम केले. पहिली पत्नी आणि मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी ती नोकरी सोडली.
या दरम्यान दादासाहेब फाळके यांनी स्वतःचा छापखाना सुरू केला. प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांच्यासोबत काम केल्यानंतर ते भारताबाहेर पहिल्यांदाच जर्मनीला गेले. तिथे त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा 'द लाइफ ऑफ क्राइस्ट' हा चित्रपट पाहिला आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी भारतात येऊन पहिला चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. पहिला चित्रपट करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. हा चित्रपट बनवण्यासाठी त्याला सहा महिने लागले होते.
पत्नी आणि मुलाच्या मदतीने त्यांनी पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' बनवला. हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांना तब्बल 15 हजार रुपये लागले होते. या चित्रपटात त्यांच्या पत्नीने वेशभूषेचे काम हाताळले आणि त्यांच्या मुलाने हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका केली. कोणतीही स्त्री काम करायला तयार नसल्याने दादासाहेबांच्या चित्रपटात पुरुषांनी स्त्री पात्र साकारली होती. या चित्रपटाने भारतात एक नवं विश्व निर्माण केलं.
हेही वाचा :
- Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चे नवे पोस्टर प्रदर्शित, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
- Jersey Release Date : शाहिद कपूरचा 'जर्सी' सिनेमा 14 एप्रिलला होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha