'शक्तिमान नव्हे हा तर किलविश!' वादग्रस्त वक्तव्यामुळं मुकेश खन्नांवर टीकेचा भडिमार
ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) हे सध्या वादग्रस्त वक्तव्यामुळं चांगलेच ट्रोल होत आहेत. काम करणाऱ्या महिलांबाबत त्यांचं वक्तव्य व्हायरल झालंय त्यानंतर त्यांना काही यूझर्सनी शक्तिमान नसून किलविश असल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली: ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) हे सध्या वादग्रस्त वक्तव्यामुळं चांगलेच ट्रोल होत आहेत. सध्या मुकेश खन्ना हे प्रत्येक ट्रेंडिंग विषयावर आपलं मत व्हिडीओद्वारे व्यक्त करत असतात. नुकतंच त्यांनी 'द कपिल शर्मा शो' शर्माच्या शोवर टीका केली होती. त्यानंतर त्यांचा एक #MeToo मोहिमेवर मत व्यक्त करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी वर्किंग वुमेन अर्थात काम करणाऱ्या महिलांबाबत वक्तव्य केलं आहे. यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियात जोरदार टीका होत आहे. त्यांना काही यूझर्सनी शक्तिमान नसून किलविश असल्याचं म्हटलं आहे.
मुकेश खन्ना यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे की, महिलांचं घराबाहेर निघणं हेच समस्यांचं मूळ आहे. ते म्हणतात की, मी टू चा प्रॉब्लेम त्याचवेळी सुरु झाला ज्यावेळी महिला घराच्या बाहेर पडू लागल्या. महिला पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करु इच्छितात, मात्र त्या याचा विचार करत नाहीत की यामुळं त्य़ांच्या मुलांना काय काय सहन करावं लागतं. मुलं आयासोबत राहतात. आणि मग त्यांच्यासोबत 'क्योंकि सांस भी कभी बहू थी' सारख्या सिरियल्स पाहतात.
मुकेश खन्ना होत आहेत ट्रोल व्हिडीओत मुकेश खन्ना म्हणतात की, मर्द, मर्द असतो आणि महिला या महिला. यानंतर मुकेश खन्ना जोरदार ट्रोल होत आहेत. सोशल मीडियावर फॅन्सनी शक्तिमान अर्थात मुकेश खन्नांवर टीकेचा भडिमार केला आहे. काही चाहत्यांनी मुकेश खन्ना हे शक्तिमान नसून तमराज किलविश आहेत. तर अनेकांनी त्यांच्या सिरियल्स बायकॉट करण्याची मागणी केली आहे. यावर मुकेश खन्ना यांनी काही स्पष्टीकरण अद्याप दिलेलं नाही.
This man is SICK. In short, if women will step out for work, men are entitled to sexually assault them? If women want safety, they should stay at home. Shame on you @actmukeshkhanna! pic.twitter.com/G4bxbEFek0
— Gaurav Pandhi (@GauravPandhi) October 30, 2020
एक यूझरनं लिहिलं आहे की, अशा पद्धतीनं मुर्ख शक्तिमाननं समाजात आपली व्हॅल्यू वाढवली आहे. आश्चर्य़ाची गोष्ट आहे की हे कशा परिवारात वाढले. तर कुणी त्यांना 5-6 वर्षाच्या मुलींवर बलात्कार का होतात? असा सवाल केला आहे.
Childhood ruined 🤧😷...the superhero actor says #MeToo started with woman wanting to go out and work equally and parallel to man in all walks of life#Shaktimaan #mukeshkhanna Misogyny+ patriarchy is so vicious https://t.co/CHG1W1Xyax
— Ravi Dundigalla (@ravi_dundigalla) October 30, 2020