एक्स्प्लोर
इंदू सरकार, संजय गांधी आणि ‘ती’!
मुंबई : ‘इंदू सरकार’ या सिनेमात माझे वडील म्हणजेच संजय गांधी आणि माझी आजी इंदिरा गांधी यांची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमावर बंदी आणावी, अशी याचिका प्रिया सिंग पॉल यांनी कोर्टात दाखल केली होती. त्यानंतर ‘प्रिया सिंग पॉल’ हे नाव चर्चेत आलं.
‘इंदू सरकार’च्या निर्मात्यांबरोबरच मधुर भंडारकर आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी या तिघांना या संदर्भात नोटीस पाठवण्यात आली. अर्थात ही नोटीसही संजय गांधींच्या मुलीकडून म्हणजेच प्रिया सिंग हिच्या नावाने पाठवण्यात आली होती.
यातला खरा प्रश्न असा आहे की संजय गांधीना वरुण गांधी नावाचा फक्त एक मुलगा आहे. मग संजय गांधींची मुलगी असल्याचं सांगत सिनेमावर बंदी आणण्याची मागणी करणारी ही प्रिया सिंग पॉल आहे तरी कोण?
जेव्हा आम्ही या नावाचा शोध सुरु केला तेव्हा प्रिया सिंग पॉल त्यांचं ट्विटर अकाऊंट आम्हाला सापडलं ज्यामध्ये त्यांची ओळख आहे 'माजी अतिरिक्त महासंचालक, भारत सरकार'. याच अकाऊंटवरुन त्यांनी 7 जानेवारीला ट्वीट केलं होतं. त्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं.
https://twitter.com/PSPSpeaks/status/880904252780105729
संजय गांधी हे माझे खरे वडील होते हे सांगताना मला अजिबात लाज वाटत नाही किंवा ही गोष्ट जाहीर करताना मला कसलीच भीतीही वाटत नाही. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझं नाव प्रियदर्शिनी असं ठेवण्यात आलं होतं.
त्यानंतर त्यांनी 13 मार्चला आणखी एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी संजय गांधींसोबतचं त्यांचं नातं सिद्ध करण्यासाठी कोर्टाची मदत घेत असल्याचा उल्लेख केला होता.
या आणि त्यानंतरच्या पोस्टवर जेव्हा जेव्हा नेटीझन्स कमेंट्स केल्या केव्हा काही तपशिल विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी 'केस कोर्टात आहे' एवढंच उत्तर दिलं.
याच प्रिया सिंग पॉल आता 'इंदू सरकार' सिनेमासमोर दंड थोपटून उभ्या आहेत. कोर्टाची नोटीस पाठवून त्यांनी सिनेमा रिलीज होऊ नये अशी मागणी केली आहे. पण जोपर्यंत गांधी घराणं प्रिया सिंग यांच्याशी असलेलं नातं स्पष्ट करत नाही, तोपर्यंत आम्ही काहीच बोलणार नाही अशी भूमिका सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी घेतली आहे.
आता गांधी घराणं यावर खरंच काही बोलणार का? आणि या सगळ्याचा इंदूसरकार सिनेमाच्या रिलीजवर खरंच काही परिणाम होणार का?, ते येणारा काळच सांगेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement