एक्स्प्लोर
सुपरस्टार रजनीकांतच्या भेटीला 'जबरा फॅन' महेंद्रसिंग धोनी
चेन्नई : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतली. 'एमएस धोनी- दि अनटोल्ड स्टोरी' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चेन्नईत गेलेला धोनी थलैवाला भेटला. क्रीडा आणि सिनेविश्वातल्या या दोन दिग्गजांची भेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय क्षण ठरला.
फॉक्स स्टार इंडियाने या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. रजनीच्या घरी दोघांची भेट घडून आली. रजनीकांतचा मोठा चाहता असल्यामुळे धोनीने वेळात वेळ काढून त्याला गाठलं. सिनेमाच्या प्रमोशनसाठी धोनीने व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढला आहे.
एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा पुढच्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे, तर नीरज पांडे यांनी दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाच्या ट्रेलरला चाहत्यांची मोठी पसंती लाभली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement