एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जेव्हा रवी शास्त्री अमृता सिंगसोबत विवाह करणार होते...
रवी शास्त्रींना घर आणि कुटुंब सांभाळणारी पत्नी हवी होती. मात्र यशाच्या शिखरावर असलेल्या अमृताला लग्नासाठ ही तडजोड मान्य नव्हती.
मुंबई : क्रिकेट आणि सिनेमा यांचं नातं वर्षानुवर्षांपासूनचं आहे. अनेक क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांचे संबंध जुळले... कधी ते तुटले तर कधी ही नाती विवाहबंधनात रुपांतरित झाली. मात्र प्रेक्षकांसाठी कायमच चटपटीत गॉसिप्स यातून मिळत राहिली. दिग्गज क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग यांच्या अफेअरच्या चर्चाही कोणे एके काळी चवीने चघळल्या गेल्या.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग कोणे एके काळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. एका इव्हेंटमध्ये दोघांची भेट झाली आणि दोघांनी एकमेकांचे फोन नंबर एक्स्चेंज केले. फोनवरील गप्पा हळूहळू कॉफी डेट्समध्ये रुपांतरित झाल्या.
रवी शास्त्रींच्या काही दौऱ्यांवर अमृता सिंगला पाहिलं गेलं, तर अमृताच्या काही चित्रपटाच्या सेटवर रवी शास्त्रींची ये-जा वाढली होती. इतकंच काय, 1986 साली 'सिनेब्लिट्झ' या प्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हरपेजवर दोघांचा एकत्रित फोटोही छापला गेला. 'बॉलिवूडशादीज.कॉम' या वेबसाईटने तर दोघांचा साखरपुडा झाला होता, असाही दावा केला आहे.
सारं काही गोड-गुलाबी सुरळीत सुरु होतं. दोघंही लग्न करणार होते, मात्र 'नियतीच्या मनात काही वेगळंच होतं' हे वाक्य रवी शास्त्री आणि अमृता यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं. गर्लफ्रेण्ड म्हणून अमृता कितीही चांगली असती, तरी रवी शास्त्रींना अपेक्षित असलेलं वाईफ मटेरियल त्यांना अमृतात दिसलं नाही. रवी शास्त्रींना घर आणि कुटुंब सांभाळणारी पत्नी हवी होती. मात्र यशाच्या शिखरावर असलेल्या अमृताला लग्नासाठ ही तडजोड मान्य नव्हती.
'मला अभिनेत्री पत्नी नको. करिअरपेक्षा तिने घराला प्राधान्य द्यायला हवं' असं रवी शास्त्री एकदा म्हणाले. रवी शास्त्री आणि रितू सिंग यांनी 1990 साली लगीनगाठ बांधली. त्याच वेळी अमृता सिंगचं सनी देओलशी सूत जुळलं. मात्र हे प्रेमही फार काळ टिकलं नाही.
अमृता सिंगने 12 वर्षांनी तरुण असलेला अभिनेता सैफ अली खानशी 1991 साली विवाह केला. त्यावेळी ती 32 वर्षांची होती, तर सैफ अवघ्या विशीतला. त्यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं झाली. 13 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. त्यानंतर अमृता पुन्हा बोहल्यावर चढली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement