एक्स्प्लोर
Advertisement
एक्झिट पोलबाबत विवेक ओबेरॉयच्या ट्वीटमधून ऐश्वर्याची खिल्ली, विवेकवर टीकेचा भडीमार
लोकसभेच्या सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर देशभरात सर्वत्र एक्झिट पोल्सचीच चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरदेखील याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही लोकांनी त्यावर गंभीर तर काहींनी हलक्या फुलक्या शब्दात आपली मतं मांडली आहेत.
मुंबई : लोकसभेच्या सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर देशभरात सर्वत्र एक्झिट पोल्सचीच चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरदेखील याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही लोकांनी त्यावर गंभीर तर काहींनी हलक्या फुलक्या शब्दात आपली मतं मांडली आहेत. बॉलिवूड अभिनेता आणि सध्या भारतीय जनता पक्षाच्या गोटात असलेल्या विवेक ओबेरॉयनेदेखील एक्झिट पोल्सबाबत एका मिमच्या माध्यमातून त्याचं मत मांडलं आहे. परंतु या मिमच्या माध्यमातून विवेकने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा अपमान केला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून विवेकवर टीकेचा भडीमार होत आहे.
एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदींची पुन्हा लाट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाजप समर्थकांनी काँग्रेसची खिल्ली उडवणारे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यातच विवेक ओबेरॉयनेदेखील एक मिम ट्विटरवर शेअर केले आहे. त्यामध्ये त्याने एक्झिट पोल आणि निवडणुकीचा निकाल यामधील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
एक्झिट पोल आणि निवडणुकीचा निकाल यामधील फरक स्पष्ट करण्यासाठी विवेक ओबेरॉयने सलमान खान, ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या लव्ह स्टोरींचा वापर केला आहे. उदाहरण म्हणून त्याने म्हटले आहे की, सलमान खान आणि ऐश्वर्याची लव्ह स्टोरी ही ओपिनियन पोलप्रमाणे आहे. तर विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्याची लव्ह स्टोरी ही एक्झिट पोलसारखी आहे. परंतु ऐश्वर्याचं सलमान खान आणि विवेक या दोघांपैकी कोणाशीही लग्न झालं नाही, ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं हे सत्य आहे. त्यामुळेच ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न म्हणजे निवडणुकीच्या निकालाप्रमाणे आहे.
विवेक ओबेरॉयचं ट्वीट
विवेकच्या या ट्वीटनंतर त्याच्यावर लोकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. प्रामुख्याने महिलांनी विवेकला हीन प्रवृत्तीचा असल्याचे म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनेदेखील विवेकच्या या ट्वीटचा चांगलाच समाचार घेतला आहे. सोनमने त्याला Disgusting and classless म्हटले आहे. विवेकच्या ट्वीटनंतर सोनम कपूरची प्रतिक्रियाHaha! ???? creative! No politics here....just life ????????
Credits : @pavansingh1985 pic.twitter.com/1rPbbXZU8T — Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) May 20, 2019
दरम्यान विवेक ओबेरॉयने केलेल्या ट्वीटची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून त्याला नोटीस बजावली जाईल, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. विवेकच्या ट्वीटवर आलेल्या काही प्रतिक्रियाDisgusting and classless. https://t.co/GUB7K6dAY8
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) May 20, 2019
Dude wtf is wrong with you?
— Ishita Yadav (@IshitaYadav) May 20, 2019
At least this man should have thought 10,000 times before dragging a minor into it.. Shame on you Mr @vivekoberoi #VivekOberoi
— Kamlesh Sutar (@kamleshsutar) May 20, 2019
Haha! ???? creative! No politics here....just life ???????? pic.twitter.com/f3yiZ8v5O5
— Msdian Forever Mahi is love Snehu ???????????? (@SnehaPkd) May 20, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
राजकारण
बातम्या
Advertisement