एक्स्प्लोर
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!
टाइम्स नाऊने याबाबतचं वृत्त दिलं आहे. इटलीमध्ये हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.

रोम : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. टाइम्स नाऊने याबाबतचं वृत्त दिलं आहे. इटलीमध्ये हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. इटलीमधील एका रिसॉर्टमध्येच हा सोहळा झाला.
मुंबईतील वांद्र्या्च्या फॅमिली कोर्टात जाऊन अनुष्काने स्वतः लग्नाच्या नोंदणीसाठी लागणारा फॉर्म आणल्याची माहिती होती. पीपींगमून.कॉम या वेब पोर्टलने याबाबत रिपोर्ट दिला होता. त्यामुळे विराट-अनुष्काचं विवाहस्थळ आणि तारीख याबाबत चर्चांना उधाण आलं होतं.
येत्या शनिवारी म्हणजेच 9 डिसेंबरला विराट-अनुष्का लगीनगाठ बांधणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. विराटचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी सीके नायडू अंडर 23 सेमी फायनलमधून सुट्टी घेतल्यामुळे या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं जात होतं.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















