एक्स्प्लोर
विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीची नेमकी किंमत किती?
या स्टार कपलच्या लग्नात साऱ्या गोष्टी या स्पेशलच होत्या. पण सर्वात खास गोष्ट म्हणजे विराटनं अनुष्काला दिलेली अंगठी.
मिलान (इटली) : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या इटलीतील लग्नसोहळाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. त्यांच्या लग्नासाठी डिझाइन करण्यात आलेल्या ड्रेसपासून ते त्यांच्या दागिन्याचीही सध्या चर्चा सुरु आहे. याचदरम्यान, विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीबाबत रंजक माहिती समोर आली आहे.
या स्टार कपलच्या लग्नात साऱ्या गोष्टी या स्पेशलच होत्या. पण सर्वात खास गोष्ट म्हणजे विराटनं अनुष्काला दिलेली अंगठी. अनुष्कासाठीची अंगठी शोधण्यासाठी विराटला तब्बल तीन महिने लागले असल्याची चर्चा आहे.
विराटनं अनुष्कासाठी जी अंगठी निवडली ती प्रचंड महाग आहे. या अंगठीमध्ये एक खास हिराही बसवण्यात आला आहे. ऑस्ट्रियाचा एका डिझायनरनं ही अंगठी तयार केली आहे.
या अंगठीची खासियत म्हणजे, ही अंगठी तुम्ही जेवढ्या अँगलमधून पाहाल तितक्यांदा तिची डिझाइन वेगवेगळी दिसेल. या अंगठीची किंमत तब्बल 1 कोटी असल्याचीही चर्चा आहे. विराट कायमच अनुष्कासाठी काही तरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करतो. यंदाही त्यानं असंच काहीसं केलं आहे.
दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन
विराट आणि अनुष्काचा लग्नसोहळा अत्यंत खाजगी पद्धतीने करण्यात आला असला तरी भारतात रिसेप्शनचा मोठा कार्यक्रम होणार आहे. 21 तारखेला दिल्लीत, तर 26 तारखेला मुंबईत जंगी रिसेप्शन होणार आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील आणि क्रिकेटमधील दिग्गज हजर असतील.
इटलीमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्याला विराट आणि अनुष्काच्या कुटुंबीयांसह काही निवडक लोकच उपस्थित होते. आता भारतात परतल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जंगी रिसेप्शन ठेवणार आहेत. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाही व्हायरल झाली आहे.
या कार्यक्रमानंतर विराट कोहली नव्या वर्षात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. पाच जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. तर अनुष्काही शुटिंगला सुरुवात करणार आहे.
संबंधित बातम्या :
पाकिस्तानी किक्रेटर्सकडूनही 'विरानुष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा
VIDEO : 'विरानुष्का'चं लग्न झालेलं 'हेच' ते खास ठिकाणं!
विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!
विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो!
दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन
रब ने बना दी जोडी... 'विरानुष्का'ची लव्हस्टोरी
क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या नात्याची परंपरा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement