एक्स्प्लोर

Satara ZP Election Result 2026 : साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेनं खातं उघडलं, शंभूराज देसाईंचा तारळे जिल्हा परिषद गटात विजयाचा झेंडा, मकरंद पाटील यांना तळदेवमध्ये धक्का

Satara ZP Election Result 2026 : सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जिल्हा परिषद गट आणि 129 जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं खातं उघडलं आहे.

Satara ZP Election Result 2026 सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीच्या अपडेटनुसार साताऱ्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं खातं उघडलं आहे. पाटण तालुक्यातील तारळे जिल्हा परिषद गट, महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गट, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसनं साताऱ्याच्या खेड जिल्हा परिषद गटात विजय मिळवला आहे.  लिंब जिल्हा परिषद गटातून भाजपचे सर्जेराव सावंत विजयी झाले आहेत. 

शिवसेनेनं खातं उघडलं, शंभूराज देसाईंचं वर्चस्व कायम 

तारळे जिल्हा परिषद गट आणि तारळे पंचायत समिती गण आणि मुरुड पंचायत समिती गणातून शिवसेनेचे  उमेदवार विजयी झाले आहेत. तारळे जिल्हा परिषद गटातून स्वप्नाली पाटील  विजयी झाल्या आहेत. तारळे पंचायत समिती गणातून सविता पवार प्रकाश जाधव विजयी झाल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील मतदारांनी 67.80 टक्के मतदान केलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कारभारी निवडण्यासाठी जिल्ह्यातील 21 लाख 94 हजार 110 मतदारांपैकी 14 लाख 87 हजार 554 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

तळदेवमध्ये मकरंद पाटील यांना धक्का

मंत्री मकरंद पाटील यांना तळदेवमध्ये धक्का बसला आहे.  महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गटात शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार अजित सपकाळ विजयी झाले आहेत. अजित सपकाळ हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत.

साताऱ्यात भाजपनं खातं उघडलं

सातारा जिल्हा परिषदेच्या लिंब गटाचा निकाल हाती आला आहे. लिंब गटातून सर्जेराव सावंत विजयी झाले आहेत. लिंब गणातून भाजपचेच प्रभाकर पवार विजयी झाले. कोंडवे गणातून महेश गाडे विजयी झाले आहेत.

खेड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे कामेश कांबळे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या संदीप शिंदे यांचा पराभव केला आहे. 

कराड तालुका - सातारा जिल्हा (चौथ्या फेरी अखेरची आकडेवारी)

उंब्रज जिल्हा परिषद गट भाजप आघाडीवर

महागाव पंचायत समिती गणात काँग्रेसचे संग्राम पवार बाराशे मतांनी आघाडीवर

उंब्रज पंचायत समिती गणात भाजप 23 मतांनी आघाडीवर

विंग जिल्हा परिषद गटात तिन्ही जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर

कार्वे जिल्हा परिषद गटातील ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर

काले जिल्हा परिषद गटातील कालवडे गणात राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडीवर तर अन्य दोन जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर

रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद गटात किती ठिकाणी भाजप आघाडीवर

वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या उमेदवार सुनंदा पाटील आघाडीवर 

कराड पंचायत समिती वारूंजी गणात पाचशे मताने काँग्रेस उमेदवार 500 मतांनी आघाडी तर कोयना वसाहत गणात काँग्रेस उमेदवार आघाडीवर

तांबवे जिल्हा परिषद गटात आणि सुपने भाजप आघाडीवर तांबवे गणात शिवसेना उमेदवार

कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात तिन्ही अपक्ष उमेदवारांनी घेतली आघाडी

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget